अरे भिकारी माणसा, मी तुझ्यासारखा नाही...! केआरके-विंदू दारा सिंग यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:27 PM2021-06-23T12:27:00+5:302021-06-23T12:27:41+5:30

कमाल आर खान उर्फ केआरकेने आत्तापर्यंत अनेकांशी पंगा घेतला. अगदी अजय देवगण, सलमान खानपासून तर मिका सिंगपर्यंत. आता केआरके आणि अभिनेता विंदू दारासिंग यांच्यात जुंपली आहे.

Vindu Dara Singh accused KRK of writing a review by taking money, the film critic replied | अरे भिकारी माणसा, मी तुझ्यासारखा नाही...! केआरके-विंदू दारा सिंग यांच्यात जुंपली

अरे भिकारी माणसा, मी तुझ्यासारखा नाही...! केआरके-विंदू दारा सिंग यांच्यात जुंपली

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे केआरकेने सलमान खानच्या ‘राधे’चा निगेटीव्ह रिव्ह्यू दिला होता. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होतेय.

बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान (Kamal R Khan) उर्फ केआरकेने (KRK) आत्तापर्यंत अनेकांशी पंगा घेतला. अगदी अजय देवगण, सलमान खानपासून तर मिका सिंगपर्यंत. आता केआरके आणि अभिनेता विंदू दारासिंग (Vindu Dara Singh) यांच्यात जुंपली आहे.  केआरकेने विंदूची तुलना डुकरासोबत केली. मग काय विंदू भडकला.  संतापलेल्या विंदूनं पलटवार करत, केआरकेला पैसे घेऊन रिव्ह्यू करणं आता थांबव,असा सल्ला त्याला दिला.  आता केआरकेनं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  मी तुझ्यासारखा भिकारी नाही, असं म्हणत केआरकेने विंदूची खिल्ली उडवली आहे.
विंदू व केआरकेचा वाद सुरू झाला तो मिका सिंगमुळे. गेल्या काही दिवसांपासून केआरके मिकावर टीका चालवली आहे. मिका व केआरकेच्या वादात उडी घेत विंदूने मिकाची बाजू घेतली होती. याचा वचपा म्हणून केआरकेने विंदूची तुलना डुकरासोबत केली होती. या तुलनेनं विंदू संतापला होता. 

 एक  व्हिडीओ शेअर करत विंदूनं केआरकेला फैलावर घेतलं होतं. ‘ रिव्हू करण्यासाठी केआरकेला पैसे मिळाले तर तो चित्रपटाचे कौतुक करतो आणि जर पैसे मिळाले नाही तर चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू देतो. पण आता पैसे घेऊन रिव्ह्यू करणं थांबव,’ असं विंदू या व्हिडिओत म्हणाला होता.

या व्हिडीओवर केआरकेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘माणसं आपल्या लायकीनुसारचं बोलतात. पाच वर्षांपूर्वी आजय देवगणनं 25 लाख रुपये घेऊन निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्याचा आरोप माझ्यावर केला होता. आता हाच आरोप  तू करतो आहेस. पण मी पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी पाच लाख घेतले असं तू सांगतो आहेस. अबे भिकारी,मी तुझ्यासारखा भिकारी नाही,’ अशा आशयाचं टिष्ट्वट केआरकेनं केलं आहे.
आता हा वाद कोणत्या वळणावर जातो ते बघूच. अलीकडे केआरकेने सलमान खानच्या ‘राधे’चा निगेटीव्ह रिव्ह्यू दिला होता. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होतेय.

Web Title: Vindu Dara Singh accused KRK of writing a review by taking money, the film critic replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.