डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:07 PM2022-06-28T17:07:58+5:302022-06-28T17:08:55+5:30

Pushpa - The Rule, Pushpa 2: ‘पुष्पा’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे.

Vijay Sethupathi To Be Cast As A Senior Cop In Allu Arjun- Pushpa The Rule? Pushpa 2 |  डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

 डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

googlenewsNext

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘पुष्पा- द राईज’  (Pushpa: The Rise) या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुन  (Allu Arjun) व रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) साऊथचा हा सिनेमा तुफान गाजला.  सिनेमातील गाणी आणि संवादांनादेखील प्रेक्षकांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.  हा सिनेमा इतका लोकप्रिय झाला की आता प्रेक्षक दुसऱ्या भागाची अर्थात ‘पुष्पा- द रूल’ची (Pushpa 2: The Rule) आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. होय, ‘पुष्पा 2’मध्ये आणखी एका धमाकेदार साऊथ स्टारची एन्ट्री होणार आहे.  हा साऊथ स्टार कोण तर विजय सेतुपती (Vijay Sethupathi).

होय, ‘पुष्पा 2’बद्दलची नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, ‘पुष्पा 2’मध्ये फहाद फासिलनंतर विजय सेतुपती पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा 2’ला सुपरडुपर हिट बनवण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. आता या चित्रपटात विजय सेतुपतीची एन्ट्री पक्की मानली जात आहे. विजय सेतुपतीच्या एन्ट्रीच्या बातमीने साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत.

रिपोर्टनुसार, विजय सेतुपती या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. त्याची भूमिका फहाद फासिलसारखी असेल की वेगळी, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण यानिमित्ताने डबल धमाका होणार हे नक्की.

 श्रीवल्लीचा होणार मृत्यू...?
 चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या भूमिकेतील अल्लू अर्जून   आणि श्रीवल्लीच्या भूमिकेतीज रश्मिकाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. दोघांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रत्येकाला भावली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ही केमिस्ट्री पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु, रिपोर्टनुसार, श्रीवल्लीच्या पात्राला दुसऱ्या भागात कमी सीन्स देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर तिचा मृत्यू दाखवला जाईल. चित्रपटातील विलन (फहाद फासिल) हा श्रीवल्लीची हत्या करतो, असं दाखवलं जाईल आणि पुष्पा याचा बदला घेईल.  आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे माहित नाही. पण सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

Web Title: Vijay Sethupathi To Be Cast As A Senior Cop In Allu Arjun- Pushpa The Rule? Pushpa 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.