Vidyut Jammwal film Junglee Official Trailer | विद्युत जामवाल आणि भोलाच्या मैत्रीची कथा! पाहा, ‘जंगली’चा ट्रेलर!!
विद्युत जामवाल आणि भोलाच्या मैत्रीची कथा! पाहा, ‘जंगली’चा ट्रेलर!!

ठळक मुद्दे माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणारा या ट्रेलरमध्ये हस्तीदंताच्या तस्करीसाठी हत्तींची होणारी शिकार, शिका-यांच्या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले संबंध अशा वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’. चित्रपटाचे नाव ऐकून यात काय असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. होय, आपल्या जंगलांची आजची स्थिती यात दर्शवण्यात आली आहे. काही क्षणांपूर्वी ‘जंगली’चा ट्रेलर रिलीज झाला. अभिनेता विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे. जंगली शिका-यांपासून प्राण्यांचे रक्षण करताना तो दिसतोय. इमोशन आणि अ‍ॅक्शन अशा दोन्हींचा तडका असलेला हा सोशल मीडियावर जबरदस्त हिट ठरला आहे. 


भोला नावाच्या एका हत्ती विद्युतचा मित्र असतो. हत्तीदंतासाठी शिकारी भोलाच्या मागे पडतात. शिका-यांच्या तावडीतून विद्युत भोलाला कसे वाचवतो, याची ही कथा आहे. माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणारा या ट्रेलरमध्ये हस्तीदंताच्या तस्करीसाठी हत्तींची होणारी शिकार, शिका-यांच्या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले संबंध अशा वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. चक रसेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. पूजा सावंत आणि अतुल कुलकर्णी हे दोन मराठमोळे कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटांचे चाहते असाल तर ‘जंगली’चा ट्रेलर तुम्ही पाहायलाचं हवा.
लवकरच विद्युतचा ‘कमांडो 3’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘कमांडो’सीीिजचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘कमांडो’ आणि ‘कमांडो 2’ या दोन्ही चित्रपटात विद्युत मुख्य भूमिकेत होता. ‘कमांडो’ सुपरहिट झाला होता. यानंतर आलेला ‘कमांडो 2’ बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण यातील विद्युतचा अ‍ॅक्शन अवतार सगळ्यांनाच भावला होता.

English summary :
Junglee trailer was released. Actor Vidyut Jamwal is in the lead role. He seems to protect animals. This movie has a huge hit on social media. Directed by Chuck Russell, the film is being released on April 5. Marathi actor Pooja Sawant and Atul Kulkarni play an important role in this movie.


Web Title: Vidyut Jammwal film Junglee Official Trailer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.