जंगलात साप पकडायला गेला विद्युत जामवाल, फनी आहे व्हिडीओचा क्लायमॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 04:56 PM2020-11-05T16:56:00+5:302020-11-05T16:56:37+5:30

विद्युत आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Vidyut Jammwal catching snake in the jungle funny video getting viral on social media | जंगलात साप पकडायला गेला विद्युत जामवाल, फनी आहे व्हिडीओचा क्लायमॅक्स

जंगलात साप पकडायला गेला विद्युत जामवाल, फनी आहे व्हिडीओचा क्लायमॅक्स

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये एक धमाकेदार अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख निर्माण केली आहे. विद्युतच्या जवळपास सर्वच सिनेमात बाकी काही असो वा नसो पण धमाकेदार अ‍ॅक्शन असतातच. तो नेहमीच त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्स फॅन्सना नेहमीच आश्चर्यचकित करत असतो.

विद्युत आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यात तो साप पकडताना दिसत आहे. व्हिडीओची सुरूवात जेवढी रहस्यमय आहे तेवढाच या व्हिडीओचा क्लायमॅक्सही रहस्यमय आणि मजेदार आहे. विद्युतच्या अ‍ॅक्टिंगची कमाल आहे.

या व्हिडीओत विद्युत जामवाल जंगलात एका झाडाखाली बसलेला आहे आणि सापाला बिळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आजूबाजूला फारच टेंस वातावरण तयार झालं आहे. कॅमेरामन आणि इतर लोकांना विद्युत सतत मागे सरकण्यासाठी इशारा करत आहे. पण शेवटी मोठा संघर्ष केल्यावर बिळातून जे बाहेर काढतो ते बघून सर्वांना हसू येऊ लागतं.

विद्युत जामवाल बिळातून साप नाही तर बेल्ट काढतो. हा बेल्ट तो नंतर पॅंटला लावतो. या व्हिडीओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, द रिचेस्ट नावाच्या पोर्टलने अशा काही लोकांची यादी तयार केली ज्यांच्या नादी लागू नये. या लिस्टमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतिन, अ‍ॅडव्हेंचरर ग्रिल्ससोबतच विद्युत जामवाल याच्याही नावाचा समावेश आहे.

Web Title: Vidyut Jammwal catching snake in the jungle funny video getting viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.