विद्युत जामवालला झाली अमित शहांना घट्ट मिठी मारण्याची इच्छा...पण चुकून; वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:00 AM2020-07-28T11:00:24+5:302020-07-28T11:00:55+5:30

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवाल सध्या ट्विटरवर ट्रोल होतोय. का तर एक छोटीशी चूक. 

vidyut jammwal accidentally tag amit shah instead of amit sadh | विद्युत जामवालला झाली अमित शहांना घट्ट मिठी मारण्याची इच्छा...पण चुकून; वाचा काय आहे भानगड

विद्युत जामवालला झाली अमित शहांना घट्ट मिठी मारण्याची इच्छा...पण चुकून; वाचा काय आहे भानगड

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच ‘द रिचेस्ट’ या नामांकित वेब पोर्टलने जगातील दहा सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत विद्युत जामवाल याच्या नावाचा

जगातील दहा सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांच्या यादीत स्थान मिळवणारा बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवाल सध्या ट्विटरवर ट्रोल होतोय. का तर एक छोटीशी चूक. होय, विद्युतला अभिनेता अमित साधला हग करायचे होते आणि चुकून त्याने हग केले ते अमित शहा यांना. आता ही काय नवी भानगड आहे तर चला जाणून घेऊ या.
तर विद्युत सध्या त्याचा ‘खुदा हाफिज’ या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता आणि त्याने तो आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर शेअर केला होता. विद्युतच्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून अभिनेता अमित साध त्याने त्याची भरभरून प्रशंसा केली. ‘विद्युत तू पडद्यावर जे काही करतोस, ते थेट मनाला भिडते,’ असे अमित साधने लिहिले. सोबत विद्युतला त्याच्या या नव्या सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्यात. अमितचा हा कौतुकाने भरलेला मॅसेज पाहून विद्युतने त्याला रिप्लाय दिला. मात्र या रिप्लायमध्ये अमित साधला टॅग करण्याऐवजी चुकून त्याने अमित शहा यांना टॅग केले. यात त्याने अमित शहा यांना व्हर्च्युअल हगही केले. 

झाले, मग काय विद्युतची ही चूक नेटक-यांनी नेमकी पकडली. यानंतर नेटक-यांनी विद्युतची चांगलीच मजा घेतली. युजर्सनी यावर अनेक मजेशीर कमेंट्स दिल्यात.

काही दिवसांपूर्वीच ‘द रिचेस्ट’ या नामांकित वेब पोर्टलने जगातील दहा सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, जगप्रसिद्ध साहसी वीर बेयर ग्रिल्स यासारख्या मंडळींसोबत विद्युत जामवाल याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

Web Title: vidyut jammwal accidentally tag amit shah instead of amit sadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.