बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालन हिने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती शेवटची मिशन मंगल चित्रपटात झळकली होती.या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फार कमी लोकांना माहित आहे की विद्या बालनची चुलत बहिण देखील अभिनेत्री आहे. पण ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं नाव आहे प्रिया मणी राज. ती नुकतीच मनोज वाजपेयीसोबत द फॅमिली मॅन वेबसीरिजमध्ये झळकली आहे.

प्रिया मणी राज सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर खूप फॉलोव्हर्स आहेत.


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रिया मणी ही आघाडीची नायिका असून मॉडेलिंगपासून तिने करियरची सुरूवात केली आहे.

तसेच तिने तमीळ, तेलगू, कन्नड व मल्याळम सिनेमात काम केलं आहे. प्रिया मणीने मुथ्थाझागू या चित्रपटात तिने केलेल्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.


इतकंच नाही तर प्रिया मणी बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत थिरकली आहे. चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील वन टू थ्री फोर, गेट ऑन द डान्स फ्लोअर या गाण्यात ती  शाहरूखसोबत झळकली आहे.


विद्या बालन ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये चॅलेंज स्वीकारताना दिसते. त्याप्रमाणे प्रिया मणीदेखील दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत वेगवेगळ्या एक्सप्रेरिमेंटल भूमिका करताना दिसते.


प्रिया मणी सर्वात पहिल्यांदा २०१० साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट रावणमध्ये झळकली होती. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर तिने त्याच वर्षी रक्त चरित्र चित्रपटात काम केले होते.


प्रिया मणी सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर ती ट्रेडिशनलसोबत वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूप ग्लॅमरस दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vidya Balan's sister is also actress, looks very bold and glamorous, See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.