'कलयुग' सिनेमातील 'ती' बबली अभिनेत्री आता झाली सुपरबोल्ड, VIDEO बघून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:20 PM2021-10-21T14:20:07+5:302021-10-21T14:22:02+5:30

Ssmilly Suri : 'कलयुग'मधील ती बबली मुलगी आता फार बोल्ड झाली आहे. स्मायली सूरी इतकी बदलली आहे की, तिला ओळखणंही अवघड आहे.

Video : Ssmilly Suri the naive actress of Kalyug is now superbold cant believe watching video | 'कलयुग' सिनेमातील 'ती' बबली अभिनेत्री आता झाली सुपरबोल्ड, VIDEO बघून बसणार नाही विश्वास

'कलयुग' सिनेमातील 'ती' बबली अभिनेत्री आता झाली सुपरबोल्ड, VIDEO बघून बसणार नाही विश्वास

Next

बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) काही सिनेमांनी आपली छाप सोडली की, ते सिनेमे इतक्या वर्षांनंतरही लोक विसरत नाहीत. एक असाच सिनेमा आहे 'कलयुग' (Kalyug). या सिनेमात दिसणारी अभिनेत्री स्मायली सूरीचा (Ssmilly Suri) भोळेपणा, साधेपणा आजही लोकांच्या मनात घर करून आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, 'कलयुग'मधील ती बबली मुलगी आता फार बोल्ड झाली आहे. स्मायली सूरी इतकी बदलली आहे की, तिला ओळखणंही अवघड आहे.

स्मायली सूरी गेल्या काही वर्षांपासून रूपेरी पडद्यापासून दूर आहे. स्मायली गेल्या काही वर्षांपासून एक रहस्यमय जीवन जगत आहे. तिला लूकही आधीपेक्षा फार बदलला आहे आणि ती सोशल  मीडियावरही फार अॅक्टिव राहते. स्मायली भलेही बॉलिवूडमद्ये जास्त काम करत नसली तरी ती एक चांगली पोल डान्सर झाली आहे. तिने बॅकलेस टॉपमध्ये एक पोल डान्सचा व्हिडीओ शेअर केलाय.

तुम्हाला माहीत नसेल पण स्मायली बॉलिवूडमध्ये आउट साइडर नाहीये. ती एका मोठ्या बॉलिवूड परिवारातील आहे. ती बॉलिवूड स्टार आलिया भट्टची फर्स्ट कजिन आहे. इमरान हाश्मी सुद्धा नात्याने तिचा भाऊ लागतो. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील दिग्दर्शक मोहित सूरीची ती बहीण आहे.

स्मायलीचा जन्म ३० एप्रिल १९८३ ला मुंबईत झाला होता. २००५ मध्ये स्मायलीने 'कलयुग' सिनेमातून डेब्यू केलं होतं. तो मोहित सूरीचाही दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं होतं. पण याने स्मायलीच्या करिअरला फार काही फायदा झाला नाही. या सिनेमानंतर स्मायली 'ये मेरा इंडिया', 'क्रूक', 'क्रैकर्स' सारख्या सिनेमात दिसली. पण तिला फार यश मिळालं नाही.

लग्नाच्या दोन वर्षात स्मायली पतीपासून वेगळी झाली होती. पर्सनल लाइफमधील समस्या आणि सिनेमात मिळालेल्या अपयशामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. एका मुलाखतीत स्मायलीने सांगितलं होतं की, तिच्या वडिलांचं आणि आजीचं निधन झालं होतं. यानंतर तिला धक्का बसला होता आणि ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
 

Web Title: Video : Ssmilly Suri the naive actress of Kalyug is now superbold cant believe watching video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app