Video: नवाजुद्दीन सिद्दीकी सोडवणार हत्येचं गुढ, 'रात अकेली है'चा दमदार ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:08 PM2020-07-17T21:08:38+5:302020-07-17T21:09:06+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 'रात अकेली है'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

Video: Nawazuddin Siddiqui's murder mystery to be solved, powerful trailer of 'Raat Akeli Hai' out | Video: नवाजुद्दीन सिद्दीकी सोडवणार हत्येचं गुढ, 'रात अकेली है'चा दमदार ट्रेलर आऊट

Video: नवाजुद्दीन सिद्दीकी सोडवणार हत्येचं गुढ, 'रात अकेली है'चा दमदार ट्रेलर आऊट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव आहे रात अकेली है. हा चित्रपट क्राइमवर आधारीत आहे. यात नवाज एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची खूप चर्चा होते आहे.


रात अकेली है चित्रपटात राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघांच्याही दमदार अभिनयासह डायलॉग ऐकायला मिळत आहेत. नवाज यात मर्डर मिस्ट्री सॉल्व करताना दिसणार आहे. जटिल यादव असं नवाजच्या रोलचं नाव आहे. एका मोठ्या नेत्याचा खून झाला आहे आणि त्याच्या खुनाच्या तपासाची जबाबदारी ही नवाजवर असते. ट्रेलरध्ये या सगळ्यातील गुंतागुंतही पहायला मिळत आहे.



रात अकेली है या सिनेमात नवाज व्यतिरीक्त राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे अनेक कलाकार दिसणार आहेत.

सिनेमाच्या रिलीजबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 31 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Web Title: Video: Nawazuddin Siddiqui's murder mystery to be solved, powerful trailer of 'Raat Akeli Hai' out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.