मिथिला पालकरच्या गोल्डन साडीतील अदांनी चाहत्यांना केलं क्रेझी, एकदा पहाच हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:00 AM2021-03-19T06:00:00+5:302021-03-19T06:00:00+5:30

मिथिलाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटोशूट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

video of Mithila Palkar's golden saree made fans crazy, watch this video once | मिथिला पालकरच्या गोल्डन साडीतील अदांनी चाहत्यांना केलं क्रेझी, एकदा पहाच हा व्हिडीओ

मिथिला पालकरच्या गोल्डन साडीतील अदांनी चाहत्यांना केलं क्रेझी, एकदा पहाच हा व्हिडीओ

googlenewsNext

अभिनेत्री मिथिला पालकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. मिथिलाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटोशूट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नेहमी सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंनी चर्चेत येणारी अभिनेत्री मिथिला पालकरने नुकताच इंस्टाग्रामवर एका फोटोशूट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने गोल्डन रंगाची साडी नेसली असून ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. या व्हिडीओतील तिच्या अदा चाहत्यांना खूप भावताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. आतापर्यंत दीड लाखांहून जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.  

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून मितालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटाद्वारे तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये देखील झळकली होती.

Web Title: video of Mithila Palkar's golden saree made fans crazy, watch this video once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.