VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:10 PM2021-04-03T14:10:16+5:302021-04-03T14:11:19+5:30

करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करून तिच्या विकेंडबद्दल सांगितले.

VIDEO: Eat vegetables, fresh vegetables ...! Karisma Kapoor was seen playing with vegetables | VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सिनेमात झळकत नसली तरीही सध्या सोशल मीडियावर ती बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव असते. करिश्मा कपूर नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर नुकतेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असा शनिवार जातो. जे करायला मला आवडते. भाज्या धुणे आणि वाळवणे. या व्हिडीओत करिश्मा भाज्या उन्हात सुकवण्यासोबत त्यांच्यासोबत खेळताना दिसतो आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

90 च्या दशकात करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र लग्नानंतर करिश्मा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत ती दिसते. पण ते पुरेसे नाही,अशात लोलो इतके लक्झरी आयुष्य जगते तरी कसे? असा प्रश्न चाहत्यांना साहजिकच पडतो.करिश्मा उत्तम अभिनेत्री असल्यासोबत एक उत्तम बिझनेस वुमनही आहे.


वेगवेगळ्या ब्रँडमध्येही करिश्माने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळते. संजयने आपल्या मुलांच्या नाव 14 कोटींचे बॉन्ड खरेदी केले आहेत. याच्या व्याजापोटी करिश्माला महिन्याला 10 लाख मिळतात. इतकेच नाही तर पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीच्या रकमेतूनही ती आजही आलिशान आयुष्य जगते. करिश्मा आपल्या दोन मुलांसोबत मुंबईच्या खारस्थित फ्लॅटमध्ये राहते. घटस्फोटानंतर संजयने हा फ्लॅट तिला दिला होता.

Web Title: VIDEO: Eat vegetables, fresh vegetables ...! Karisma Kapoor was seen playing with vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.