ठळक मुद्दे'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत'केसरी' चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'केसरी'बाबत रसिकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. हे पोस्टर अक्षयने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आणि सांगितले की लवकरच केसरीशी संबधीत काही पाने उलगडणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांना खूप भावते आहे. या पोस्टरमध्ये अक्षयने पगडी परिधान केली असून हातात तलवार पाहायला मिळते आहे. 

याशिवाय या चित्रपटातील त्याचा लूक शेअर करत अक्षयने लिहिले की, 'आज माझी पगडी पण केसरी, जे वाहेल ते रक्त देखील केसरी आणि माझे प्रत्युत्तरदेखील केसरी.'

अक्षयने नुकतेच या चित्रपटाची पहिली झलकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. 

'केसरी' चित्रपट १८९७ साली ब्रिटीश इंडियन आर्मी व अफगाना पश्तो मिलिट्रीमध्ये सारागढी येथे युद्ध झाले होते, त्यावर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Video: Akshay Kumar's 'Kesari' movie glimpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.