Video: ऐश्वर्या रायचा थ्रोबॅक व्हिडीओ झाला व्हायरल, स्टेजवरील डान्स परफॉर्मन्सने घातला होता धुमाकूळ

By तेजल गावडे | Published: November 13, 2020 11:12 AM2020-11-13T11:12:38+5:302020-11-13T11:13:08+5:30

ऐश्वर्या रायचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Video: Aishwarya Rai's Throwback Video Goes Viral, Dance Performance | Video: ऐश्वर्या रायचा थ्रोबॅक व्हिडीओ झाला व्हायरल, स्टेजवरील डान्स परफॉर्मन्सने घातला होता धुमाकूळ

Video: ऐश्वर्या रायचा थ्रोबॅक व्हिडीओ झाला व्हायरल, स्टेजवरील डान्स परफॉर्मन्सने घातला होता धुमाकूळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता ती चित्रपटात पूर्वीसारखी सक्रीय दिसत नाही. मात्र तिचे जुने डान्सचे व्हिडीओ आताही सोशल मीडियावर धमाल करताना दिसतात. यादरम्यान ऐश्वर्या रायचा एक जुना डान्स व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. ज्यात ती स्टेजवर डान्स परफॉर्मन्सने धुमाकूळ घालताना दिसते आहे. ऐश्वर्या रायच्या जुन्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.


ऐश्वर्या रायचा हा व्हिडीओ आयफा अवॉर्डमधील आहे. जो २००५ साली आयोजित झाला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या तिच्या सुपरहिट गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसते आहे. हा व्हिडीओ युट्यूबरवर पोस्ट करण्यात आला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. ऐश्वर्याने नुकताच तिचा ४७वा वाढदिवस साजरा केला. यावेळचे तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.


ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती फन्ने खां चित्रपटात झळकली होती. ऐश्वर्या राय बच्चन मेलफिसेंटः मिस्ट्रेस ऑफ एविलच्या हिंदी व्हर्जनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या जागी पहायला मिळणार आहे.

या चित्रपटासाठी तिने अँजेलिना जोलीसारखा लूक केला होता, जो लोकांना खूप भावला होता. याशिवाय ती दिग्दर्शक मणिरत्नमच्या चित्रपटात दिसू शकते आणि अनुराग कश्यपच्या गुलाब जामुन चित्रपटातही दिसणार आहे.

Web Title: Video: Aishwarya Rai's Throwback Video Goes Viral, Dance Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.