विकी कौशलच्या 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, आता चित्रपटाचा 'ह्या' भाषेत बनणार रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:00 AM2019-01-28T06:00:00+5:302019-01-28T06:00:00+5:30

विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

VIcky Kaushal's Uri succeeded on the box office, now the film will be remake in 'this' language | विकी कौशलच्या 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, आता चित्रपटाचा 'ह्या' भाषेत बनणार रिमेक

विकी कौशलच्या 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, आता चित्रपटाचा 'ह्या' भाषेत बनणार रिमेक

googlenewsNext
ठळक मुद्दे'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ला बॉक्स ऑफिसवर मिळतोय खूप चांगला रिस्पॉन्स'उरी' चित्रपटाचा रिमेक बनणार तमीळ, तेलगू व मल्याळम भाषेत

अभिनेता विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने शंभर कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्रीदेखील केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर नऊ दिवसांच्या आत ९१.८४ कोटींची कमाई केली. आता म्हणे, या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. हो, ही बातमी खरी आहे. या चित्रपटाचा साऊथमध्ये रिमेक बनणार आहे.  

उरी चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला व आरएसवीपी प्रोडक्शन टीमला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या कित्येक निर्मात्यांचे फोन आले आणि हा सिनेमा आपल्या भाषेत बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे उरी : द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटाचे अधिका जास्त किमतीवर विकले गेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट तमीळ, तेलगू व मल्याळम भाषेत बनणार आहे. 
आरएसवीपी प्रोडक्शन निर्मित केदारनाथ आणि आता उरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर लगातर सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतसाठी केदारनाथ चित्रपट त्याच्या करियरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला. तर आता उरी सिनेमा अभिनेता विकी कौशलसाठी हिट बनण्यासाठी सज्ज झाला आहे. 
उरी सर्जिकल स्ट्राइक चित्रपट २०१६ साली भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकने प्रत्युत्तर दिले होते, त्यावर आधारीत आहे. विकी कौशलचा हा पहिला सिनेमा आहे ज्यात तो अॅक्शन करताना दिसला. या सिनेमात विकी कौशलसोबत मोहित रैना, परेश रावल, यामी गौतम व किर्ती कुलहारी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 


 

Web Title: VIcky Kaushal's Uri succeeded on the box office, now the film will be remake in 'this' language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.