उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्याने विविध भूमिका बॉलिवूडमध्ये केल्या. या चित्रपटातील त्याच्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटविली. मग 'रमण राघव'पासून 'मनमर्जिया', 'संजू' आणि 'राझी' यांसारख्या चित्रपटातून फक्त अभिनय कौशल्यच नाही तर तिकिटबारीवर चांगला बिझनेस केला.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'उरी' चित्रपटातून विकीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्याची मागणीही वाढू लागली. आज तकच्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरने पुन्हा एकदा विकीसाठी भूमिका पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. असे बोलले जात आहे की विकीची भूमिका आता रणवीर सिंगच्या बरोबरीची असेल.

करण जोहरची निर्मिती असलेल्या तख्त चित्रपटात रणवीर सिंग दारा शिकोहच्या भूमिकेत दिसणार आहे आणि विकी कौशल या चित्रपटात औरंगजेबच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. औरंगजेब दारा शिकोहच्या मोठ्या भावाला सत्तेसाठी मारून टाकतो. ही कथा मुघलांच्या इतिहासावर आधारीत आहे. या चित्रपट रणवीर सिंग, करीना कपूर खान, आलिया भट, विकी कौशल, अनिल कपूर, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर हे कलाकार दिसणार आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, विक्की सध्या सरदार उधम सिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी विक्कीचा  सरदार उधम सिंगमधला लूक आऊट झाला होता.

सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे.

सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.


Web Title: Vicky Kaushal's rise to the price!, his rolls equals to Ranvir Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.