Video: विकी कौशलला पाहताच फीमेल फॅनची झाली अशी अवस्था, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:06 PM2022-05-05T14:06:25+5:302022-05-05T16:41:02+5:30

विकीचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात .

Vicky kaushal video vicky kaushal met with a fan girl video appreciated by fans | Video: विकी कौशलला पाहताच फीमेल फॅनची झाली अशी अवस्था, व्हिडीओ व्हायरल

Video: विकी कौशलला पाहताच फीमेल फॅनची झाली अशी अवस्था, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

Vicky Kaushal Video: बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा असाच एक अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विकीचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात . विकी कौशलने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका चाहतीला भेटताना दिसत आहे.

अभिनेता विकी कौशलने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीला भेटताना दिसत आहे. समोर विकीला पाहून चाहतीच्या आनंदाला पारवार उरला नाही. विकीने चाहतीशी हात मिळवताच ती रडू लागली. विकीने तिला जवळ घेतले. विकीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून ते अभिनेत्याचे खूप कौतुक करत आहेत.

विकीने नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले आणि त्यादरम्यान त्याच्या लग्नाबद्दल आणि कतरिनाबद्दल खूप चर्चा झाली. मुलाखतीदरम्यान, जेव्हा विकीला विचारण्यात आले - तू तुझ्या लग्नाच्या दिवसातील तुझा आवडता क्षण आमच्यासोबत शेअर करू शकतोस का? तर विकीने हसून उत्तर दिले, 'हे सर्व काही क्षणापुरतेच नाही'.

'हॅलो इंडिया' मॅगझिनशी दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलने पत्नी कतरिनाचे कौतुक केले.. कतरिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर विशेष प्रभाव पाडते.  कतरिनाच्या रूपाने त्याला एक जीवनसाथी मिळाली आहे जी खूप समजूतदार, हुशार व्यक्ती आहे. तिच्याकडून त्याला रोज खूप काही शिकायला मिळते. 

 कॅट-विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशलचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. तो अखेरचा 'सरदार उधम सिंग'मध्ये दिसला होता. मात्र, आगामी काळात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासोबत 'साम बहादूर' चित्रपटात दिसणार आहे. यानंतर तो कियारा अडवाणीसोबत 'गोविंदा नाम मेरा'मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे.
 

Web Title: Vicky kaushal video vicky kaushal met with a fan girl video appreciated by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.