Vicky kaushal tells how his love story started with harleen sethi | तर अशी सुरु झाली विकी कौशल आणि हरलीन सेठीची लव्ह स्टोरी, विकीने पहिल्यांदाच दिली कबुली
तर अशी सुरु झाली विकी कौशल आणि हरलीन सेठीची लव्ह स्टोरी, विकीने पहिल्यांदाच दिली कबुली

ठळक मुद्देविकी आणि हरलीन जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करतायेतविकी बघताच क्षणी हरलीनच्या प्रेमात पडला.

सध्या विकी कौशलउरीचे यश सेलिब्रेट करतो आहे. उरीनंतरविकी कौशलकडे सिनेमांची रांग लागली आहे. ऐवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील विकी आपल्या लेडी लव्हसाठी वेळ काढतो. हळूहळू तो गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबतच्या रिलेशनशिपबाबत बोलू लागला आहे. टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट म्हणून हरलीन सेठीची ओळख आहे.


नुकताच एका मुलाखती दरम्यान विकीने त्याची आणि हरलीन लव्ह स्टोरी कशी सुरु झाली याचा उलगडा केला. रिपोर्टनुसार विकीने सांगितले त्याची आणि हरलीनची ओळख एका पार्टी दरम्यान झाली. विकी बघताच क्षणी हरलीनच्या प्रेमात पडला. हरलीनसोबतचा वेळ तो खूप एन्जॉय करतो असे ही त्यांने सांगितले. विकी आणि हरलीन जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करतायेत. 


कामाबाबत बोलायचे तर विकी उरीनंतर तख्तमध्ये दिसणार आहे. तसेच त्यानंतर तो एका हॉरर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त विकी कौशल व भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच हे दोघे पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात काम करणार आहेत.   या चित्रपटाची कथा अनेक दिवसांपासून किनाऱ्यावर उभा असणाऱ्या एका जहाजेवर आधारित असणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान चित्रपटाचे शीर्षक आणि इतर माहिती अद्यापही गुलदस्त्याच आहे.

Web Title: Vicky kaushal tells how his love story started with harleen sethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.