दो दिल मिल रहे है...! विकी कौशल हरलीन सेठीच्या प्रेमात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:59 PM2018-07-30T12:59:44+5:302018-07-30T13:04:26+5:30

होय, बॉलिवूडचा हा अभिनेता प्रेमात पडला आहे. एका तरूणीने विकीची रात्रीची झोप उडवली आहे.

Vicky Kaushal is dating popular with television actress and host Harleen Sethi. | दो दिल मिल रहे है...! विकी कौशल हरलीन सेठीच्या प्रेमात!!

दो दिल मिल रहे है...! विकी कौशल हरलीन सेठीच्या प्रेमात!!

googlenewsNext

 ‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार भूमिकेनंतर सध्या सगळ्यांच्याच ओठांवर विकी कौशलचे नाव आहे. बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्याच्या यादीत त्याचे नाव चढले आहे. ‘राजी’ चित्रपटानंतर ‘संजू’ मध्ये दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकल्यानंतर विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग करतोय. पण त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याची पर्सनल लाईफही चर्चेत आहे. होय, बॉलिवूडचा हा अभिनेता प्रेमात पडला आहे. एका तरूणीने विकीची रात्रीची झोप उडवली आहे. ही तरूणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री हरलीन सेठी आहे. होय, टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिच्यासोबत विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळतेय. खरे तर बऱ्याच दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेमाचा लपंडाव सुरू आहे. पण आजपर्यंत विकी वा हरलीनने कुणालाही याची कानोकान खबर होऊ दिली नाही. दिग्दर्शक आनंद तिवारीच्या माध्यमातून विकी व हरलीनची भेट झाली. मग मैत्री आणि मग प्रेम झाले.

हरलीन अनेक टीव्ही कमर्शिअलमध्ये दिसलीय. लवकरचं ती एकता कपूरच्या एका शोमध्ये दिसणार आहे. विकीचे म्हणाल तर ‘उरी’शिवाय त्याचा ‘मनमर्जिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लवकरच करण जोहरच्या चित्रपटात विकी कौशल दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंग करणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. यात विक्की मुख्य भूमिका साकारणार आहे.  

Web Title: Vicky Kaushal is dating popular with television actress and host Harleen Sethi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.