विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:25 PM2019-09-07T15:25:01+5:302019-09-07T15:25:26+5:30

विकी कौशलचा फॅन फॉलोविंग खूप वाढला आहे.

Vicky Kaushal Crazy Female Fan Landed Up In His Apartment | विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण

विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण

googlenewsNext

विकी कौशल बॉलिवूडमधील बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. उरी चित्रपटाच्या यशानंतर विकी कौशलला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्याची लोकप्रियता खूप वाढली असून त्याचे चाहते त्याला प्रत्येक ठिकाणी त्याला फॉलो करतात. त्यामुळे बऱ्याचदा त्याला अडचणीचा सामना करावा लागतो. एका मुलाखतीत विकी कौशलने एक किस्सा शेअर केला. 

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलने त्याच्या एका फिमेल फॅनबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, ती त्याच्या अपार्टमेंटपर्यंत येऊन पोहचली. इतकंच नाही तर तिने विकी कौशलच्या पालकांशी बोलली आणि सांगितलं की, ती गेल्या कित्येक महिन्यांपासून विकीसोबत चॅट करत आहे.

याबद्दल विकी कौशल म्हणाला की, खरेतर फेसबुकवर माझ्या नावाचे कित्येक फेक प्रोफाईल आहेत. ती मुलगी माझ्या फेक प्रोफाईलसोबत चॅट करत होती. हे फार डेंजरस गोष्ट आहे. त्यामुळे माझं मी वेरिफाईड अकाउंट बनवलं आणि फेक अकाउंट बंद केलं. 

विकी कौशलने सांगितलं की, त्या मुलीला या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं की ती माझ्याशी नाही तर दुसऱ्या कोणासोबत बोलत होती. मी तिला कसेतरी समजवले. या अनुभवाव्यतिरिक्त आतापर्यंत चाहत्यांसोबतचे चांगले अनुभव विकीला आले आहेत.

 दिग्दर्शक शूरजित सरकारच्या सरदार उधम सिंगमध्ये आता विकी झळकणार असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला सरदार उधम सिंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे

Web Title: Vicky Kaushal Crazy Female Fan Landed Up In His Apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.