पिंक फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशल हे खूप चांगले मित्र असून त्या दोघांनी मनमर्जियां चित्रपटात काम केले होते. नुकतेच तापसीने विकी कौशलला मॅरेज मटेरियल म्हटले आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेत्री तापसी पन्नूने एका शोदरम्यान विकी कौशल मॅरिज मटेरियल असल्याचे म्हटले. तसेच तिने मनमर्जियांच्या चित्रीकरणाआधी त्या दोघांची चॅटिंग करून मैत्री जमली असल्याचे सांगितले.

यावर विकी म्हणाला की, माझे निळे केस होते आणि तिचे लाल केस होते. याचे कारण मला माहित नाही. हे आम्ही शूट केले होते. तापसी खूप पारदर्शी व्यक्ती आहे. तिला बोलायला खूप आवडते आणि मला ऐकायला खूप आवडते.

हुक अप, मॅरी अँड किल’ या प्रश्‍नाच्या उत्तरामध्ये तापसीने वरुण धवनबरोबर हुक अप, अभिषेक बच्चनला किल आणि विकी कौशलबरोबर मॅरी असे उत्तर दिले. ती पुढे म्हणाली की, विकी हा वरुण धवन किंवा हृतिक रोशनसारखा हॉट दिसत नसला, तरी तो मॅरिज मटेरियल आहे. तसे तर सर्व पुरुष चांगले असतात. पण विकी कौशल बेस्ट आहे.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, विक्की सध्या सरदार उधम सिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

काही दिवसांपूर्वी विक्कीचा  सरदार उधम सिंगमधला लूक आऊट झाला होता. सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.


Web Title: Vicky Kaushal Birthday Special:This actress called marriage material to this actor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.