'लस्ट स्टोरी'नंतर विकी कौशल आणि कियारा आडवाणी पुन्हा दिसणार एकत्र, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 02:30 PM2021-02-26T14:30:12+5:302021-02-26T14:30:42+5:30

लस्ट स्टोरिजनंतर कियारा आडवाणी आणि विकी कौशल पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे.

Vicky Kaushal and Kiara Advani will meet again after 'Lust Story', find out about it | 'लस्ट स्टोरी'नंतर विकी कौशल आणि कियारा आडवाणी पुन्हा दिसणार एकत्र, जाणून घ्या याबद्दल

'लस्ट स्टोरी'नंतर विकी कौशल आणि कियारा आडवाणी पुन्हा दिसणार एकत्र, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने सिने इंडस्ट्रीत कमी कालावधीत आपले स्थान निर्माण झाले आहे. भूलभुलैया २ नंतर लवकरच ती दिग्दर्शक शशांक खेतानचा चित्रपट मिस्टर लेलेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती विकी कौशल सोबत रोमांस करताना दिसणार आहे. मिस्टर लेलेमध्ये वरूण धवनच्या जागी विकी कौशलची वर्णी लागली आहे. वेबसीरिज लस्ट स्टोरिजनंतर कियारा आडवाणी आणि विकी कौशल पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. ते दोघे लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्याची शक्यता आहे.


सध्या कियारा आडवाणी आणि विकी कौशल दोघेही त्यांच्या कामात व्यग्र आहेत. मात्र कियारा भूलभुलैया २ आणि विकी कौशल अश्वत्थामाच्या शूटिंगनंतर मिस्टर लेलेच्या कामाला सुरूवात करणार आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट फ्लोअरवर जाईल.


कियारा आडवाणीकडे आता जुग जुग जियो, शेरशाह आणि भुलभूलैया २ सिनेमात दिसणार आहे. कियारा नुकतीच इंदु की जवानीमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. 


विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अश्वत्थामा, सारे जहां से अच्छा, सैम, सरदार उधम सिंग आणि तख्तमध्ये दिसणार आहे. विकी कौशल शेवटचा भूत चित्रपटात दिसला होता. 


कियारा आडवाणीने २०१४ साली फगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र तिला एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून ओळख मिळाली होती. त्यानंतर ती २०१९ साली शाहिद कपूरसोबत कबीर सिंग चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तिच्यासाठी लकी ठरला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. 

Web Title: Vicky Kaushal and Kiara Advani will meet again after 'Lust Story', find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.