आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट 'पानिपत' बऱ्याच कालावधीपासून चर्चेत आहे. हा एक पीरिएड ड्रामा चित्रपट असून यातील अर्जुन कपूरचा लूक व चांगल्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत येत असतो. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात आता एका दिग्गज अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. या अभिनेत्रीने एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत बोल्ड भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. या अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. 

सूत्रांच्या माहितीनुसार, 'पानिपत' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

ही बाब जगजाहीर आहे की सकीना बेगम यांनी पानिपतच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सकीना ज्यांनी होशियारगंज राज्यातील काजमध्ये आपल्या अटी व हिमतीवर ओळख बनवली होती. तसेच राजनीतीमध्येदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या चित्रपटातील ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आशुतोष गोवारीकर यांनी या भूमिकेसाठी झीनत अमान यांची निवड केलीय. 


झीनत अमान यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय व सशक्त भूमिका साकारल्या आहेत. आशुतोष यांनी सकीना बेगमसाठी त्यांचा होकारही मिळवला आहे. पानिपतमध्ये त्या गेस्ट अपियरन्स करताना दिसणार आहेत.


आशुतोष गोवारीकर झीनत अमान यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्साही आहेत. ते म्हणाले की, मी स्वतःला नशीबवान समजतो की मला झीनतजीं यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळते आहे. त्यांचे बरेचसे सिनेमे माझ्या आवडीच्या आहेत आणि मला नेहमीच त्यांचे काम आवडले आहे. मला त्यांची एक बाब खूप स्पेशल व आकर्षित करते ती म्हणजे इतक्या मोठ्या स्टार असतानादेखील त्या खूप विनम्र आहेत. हीच गोष्ट त्यांना खूप स्पेशल बनवते.


इतकेच नाही तर आशुतोष गोवारीकर झीनत अमान यांचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 


विशेष बाब म्हणजे, १९८९ साली आशुतोष गोवारीकर यांनी अनंत बलानी यांच्या मिस्ट्री सिनेमा गवाहीमध्ये झीनत अमान यांच्यासोबत काम केले होते. त्यात आता पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय म्हणून ते खूप खूश आहेत. 


पानितपत चित्रपट तिसऱ्या महायुद्धिवर आधारीत असून यावर्षी ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Veteran actress Zeenat Aman joins cast of Ashutosh Gowariker's Panipat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.