ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या तक्रारीमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. त्यांना डायवर्टिकुला नामक आजार आहे. तनुजा यांच्यासारखेच बरेच दिग्गज कलाकार आहेत जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार जाणून घेऊयात कोण आहेत हे स्टार्स


अमिताभ बच्चन


७६ वर्षीय अमिताभ बच्चन गेल्या ३७ वर्षांपासून लीवरच्या आजाराने ग्रस्त आहेत. ३७ वर्षांपूर्वी ते कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी या अपघातात त्यांच्या लीवरला इजा झाली होती. त्याचा त्रास त्यांना आजही होतो आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या पोटात दुखण्याची तक्रार असते.


दिलीप कुमार


९५ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे. पण, ते बऱ्याच कालावधीपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याशिवाय त्यांच्या फुफ्फुसातदेखील इन्फेक्शन होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. 


धर्मेंद्र


अभिनेते धर्मेंद्र १५ वर्षांपर्यंत डिप्रेशनमध्ये होते. याच दरम्यान त्यांना दारूचे व्यसन जडले होते. धर्मेंद्र यांना दारूचे व्यसन होते, हे सर्वांनाच माहित आहे. तसेच ते कधी कधी स्मोकिंगदेखील करतात. पण, आता त्यांनी स्मोकिंग सोडले आहे.


मिथुन चक्रवर्ती


मिथुन चक्रवर्ती यांना क्रॉनिक बॅक पेनचा त्रास आहे. मागील वर्षी ही समस्या वाढल्यामुळे त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर त्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण आजार समूळ नष्ट झाला नाही. क्रॉनिक बॅक पेनमध्ये मानेपासून पाठीच्या कण्यापर्यंत दुखत असते.


ऋषी कपूर

 


ऋषी कपूर बऱ्याच कालावधीपासून कर्करोगावर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की ऋषी कपूर यांची कर्करोगापासून मुक्त झाले आहेत. मात्र त्यांचे बोन मैरो ट्रान्सप्लांट करायचे बाकी आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र बॉलिवूडमधील त्यांचे मित्रमंडळी त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला जातात.
 


Web Title: With Veteran actress Tanuja, this Bollywood celebrities also suffer from serious illness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.