हॉरर चित्रपटात बोल्ड सीन दिल्याामुळे फेमस झाली होती जॅस्मिन, अंडरवर्ल्डच्या भीतीने झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:56 PM2020-05-09T16:56:00+5:302020-05-09T17:00:01+5:30

अंडरवर्ल्डच्या भीतीने या अभिनेत्रीने अनेक वर्षांपूर्वी भारतातून पळ काढला असल्याचे म्हटले जाते.

Veerana actress Jasmin is DEAD OR ALIVE? The INTERNET is going CRAZY to know the answer PSC | हॉरर चित्रपटात बोल्ड सीन दिल्याामुळे फेमस झाली होती जॅस्मिन, अंडरवर्ल्डच्या भीतीने झाली गायब

हॉरर चित्रपटात बोल्ड सीन दिल्याामुळे फेमस झाली होती जॅस्मिन, अंडरवर्ल्डच्या भीतीने झाली गायब

googlenewsNext
ठळक मुद्देजॅस्मिनच्या बाबतीत असे म्हटले जाते की, तिच्या सौंदर्यावर एक अंडरवर्ल्डचा डॉन फिदा झाला होता. तिला तो रोज फोन करायचा... तिच्यामागे तो लागला होता. या सगळ्यामुळे जॅस्मिन इतकी घाबरली की, तिने भारत देशच सोडला आणि ती परदेशात राहायला गेली.

एकेकाळी हॉरर चित्रपटांचा ट्रेंड आला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. रामसे बंधू यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना ऐंशी-नव्वदीच्या दशकात  पाहायला मिळाले होते. या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या एक अभिनेत्री पाहायला मिळाली होती. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असून तिच्याविषयी कोणालाच माहिती नाहीये. अंडरवर्ल्डच्या भीतीने तिने अनेक वर्षांपूर्वी भारतातून पळ काढला असल्याचे म्हटले जाते. 

वीराणा हा हॉरर चित्रपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील जॅस्मिन या नायिकेला त्या काळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात या नायिकेने भूताची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या अभिनेत्रीला अक्षरशः डोक्यावर घेतले होते.  तिने यासोबतच बंद दरवाजा, डाक बंगला, पुरानी हवेली यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून गायब असून तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिच्याविषयी कोणाकडेच काहीही माहिती नाहीये.

जॅस्मिनच्या बाबतीत असे म्हटले जाते की, तिच्या सौंदर्यावर एक अंडरवर्ल्डचा डॉन फिदा झाला होता. तिला तो रोज फोन करायचा... तिच्यामागे तो लागला होता. या सगळ्यामुळे जॅस्मिन इतकी घाबरली की, तिने भारत देशच सोडला आणि ती परदेशात राहायला गेली... तेव्हापासूनच ती कोणाच्याही संपर्कात नाहीये. सध्या ती कुठे राहाते, काय करते हे कोणालाच माहीत नाहीये...

जॅस्मिनने लग्न करून ती परदेशातच सेटल झाली असे काही जण म्हणतात तर काहींच्या मते ती या जगातच नाहीये... तिच्या अनेक फॅन्सनी तिला सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला... पण तिचे कोणत्याच सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट नसल्याने त्यांची निराशा झाली.
 

Web Title: Veerana actress Jasmin is DEAD OR ALIVE? The INTERNET is going CRAZY to know the answer PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.