वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 01:52 PM2021-01-25T13:52:42+5:302021-01-25T13:53:14+5:30

वरुण धवन लग्नाच्या बेडीत अडकत त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.

Varun Dhawan shares a glimpse of his Haldi ceremony ! | वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. 

वरुण धवनसुद्धा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. वरुण धवन लग्नाच्या बेडीत अडकत त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती. रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला पोज दिल्यात. बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या मीडियाला मिठाई, लड्डू वाटण्यात आले. यावेळी सगळ्यांनी वरूण व नताशावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


लग्न ठरल्यापासून ते लग्न होत नाही तोपर्यंत सगळ्याच अपडेट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. सध्या सोशल मीडियावर नजर टाकताच तुम्हाला त्याच्या लग्नाचेच फोटो पाहायला मिळतील. या सगळ्यांमध्ये त्याचा हळदी सेरेमनीतला पिळदार बॉडी फ्लॉन्ट करत असलेल्या या फोटोनेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 


हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश

लग्नानंतर वरूण व नताशा दोघेही मीडियाला पोज देण्यासाठी रिसॉर्टच्या बाहेर आले. यावेळचा नताशाचा लूक पाहून अनेक युजर्सनी कमेंट्स केल्यात. हे दोघे ‘जस्ट मॅरिड’ तर अजिबात वाटत नाहीयेत. जणू कोणाच्या लग्नात जात आहेत, असे वाटतेय, असे एका युजरने लिहिले.अनेकांना नताशा नवीन नवरीसारखी दिसत नसल्याचे म्हटले. लग्नासारख्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणासाठी नताशाने निवडलेला ड्रेस आणि तिची ज्वेलरी पाहून अनेकांनी तिच्या बॅड चॉईसवर बोट ठेवले. काही युजर्सनी तर नताशा वरूणपेक्षा मोठी दिसतेय, असे लिहित नताशाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Varun Dhawan shares a glimpse of his Haldi ceremony !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.