- तर जीवावर बेतला असता ‘कुली नंबर 1’चा स्टंट; थोडक्यात बचावला वरूण धवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:22 AM2019-11-27T11:22:21+5:302019-11-27T11:22:36+5:30

शूटींगदरम्यान असे काही झाले की, क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले.

varun dhawan car door stuck during coolie no 1 stunt | - तर जीवावर बेतला असता ‘कुली नंबर 1’चा स्टंट; थोडक्यात बचावला वरूण धवन

- तर जीवावर बेतला असता ‘कुली नंबर 1’चा स्टंट; थोडक्यात बचावला वरूण धवन

googlenewsNext
ठळक मुद्देघटनेवेळी प्रत्येकाच्या चेह-यावर प्रचंड तणाव होता. पण वरूणने मात्र अतिशय शांतपणे स्थिती हाताळली

तरूणाईच्या गळ्यातील ताईत वरूण धवन सध्या जोरात आहे. आत्तापर्यंत वरूणने 14 सिनेमे केलेत. यापैकी केवळ दोन सिनेमे फ्लॉप झालेत, यावरूनच त्याच्या यशाची कल्पना यावी. सध्या वरूण ‘कुली नंबर 1’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा 1995 साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा स्टारर ‘कुली नंबर 1’चा रिमेक आहे. वरूण व सारा अली खान या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. सध्या पुण्याबाहेर या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण नुकतेच या शूटींगदरम्यान असे काही झाले की, क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. होय, एका स्टंट सीनच्या शूटींगदरम्यान वरूण धवन थोडक्यात बचावला.

एक कार पहाडावरून खाली उलटी लटकत असल्याचे आणि  कारमध्ये वरूण धवन असल्याचे या सीनमध्ये दाखवण्यात येणार होते. सगळे काही व्यवस्थित सुरु होते. स्टंट डायरेक्टर आणि स्टंट कॉर्डिनेटर्सनी अनेकदा या सीनची प्रॅक्टिसही घेतली होती. पण रिअल शॉटच्या वेळी गडबड झाली आणि वरूण शॉट देत असताना कारचा दरवाजा अडकला. अनेकदा प्रयत्न करूनही कारचा दरवाजा उघडत नव्हता. वरूण गाडीत होता आणि बाहेर सगळ्यांचे हृदय धडधडत होते. काही क्षण सेटवर प्रचंड खळबळ माजली. पण स्टंट कॉर्डिनेटर्सनी शर्थीचे प्रयत्न करून वरूणला गाडीतून सुरक्षित बाहेर काढले.


एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी प्रत्येकाच्या चेह-यावर प्रचंड तणाव होता. पण वरूणने मात्र अतिशय शांतपणे स्थिती हाताळली. गाडी पहाडावर उलटी लटकत असल्याने तो कमालीच्या संयमाने आणि धीराने वागला. स्टंट कॉर्डिनेटरने वरूणला सुरक्षित बाहेर काढल्यावरच सगळ्यांच्या जीवात जीव आला.

 

Web Title: varun dhawan car door stuck during coolie no 1 stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.