आयफात ‘क्वीन’ची खिल्ली उडविणे वरुण धवन अन् सैफ अली खानला पडले महागात; ट्विटरवर मागितली जाहीर माफी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 01:01 PM2017-07-18T13:01:56+5:302017-07-18T18:40:42+5:30

यंदाचा आयफा-२०१७ हा सोहळा अनेक अर्थांनी वादग्रस्त ठरताना दिसत आहे. एकीकडे शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने सुशांत सिंग ...

Varun Dhawan and Saif Ali Khan fall in the coffin of 'Queen' in IPL; Apologize for asking for Twitter | आयफात ‘क्वीन’ची खिल्ली उडविणे वरुण धवन अन् सैफ अली खानला पडले महागात; ट्विटरवर मागितली जाहीर माफी!!

आयफात ‘क्वीन’ची खिल्ली उडविणे वरुण धवन अन् सैफ अली खानला पडले महागात; ट्विटरवर मागितली जाहीर माफी!!

googlenewsNext
दाचा आयफा-२०१७ हा सोहळा अनेक अर्थांनी वादग्रस्त ठरताना दिसत आहे. एकीकडे शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने सुशांत सिंग राजपूत याला मिर्ची लागली, तर दुसरीकडे निर्माता करण जोहर याने बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिला भर सोहळ्यात डिवचल्याने, वादाला एकप्रकारची फोडणी दिली. मात्र यावेळी कंगनाला डिवचण्यासाठी करण एकटा नव्हता तर त्याच्यासोबत वरुण धवन आणि सैफ अली खान हे दोघे होते. परंतु कंगनाला डिवचणे किंवा तिची खिल्ली उडविणे हे सोपे नसल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर वरुण धवनने जाहीरपणे माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. }}}} ">I express my apology and regret .. I am extremely sorry if I have offended or hurt anyone with that act..

I express my apology and regret .. I am extremely sorry if I have offended or hurt anyone with that act..— Varun Dhawan (@Varun_dvn) July 18, 2017}}}} ">— Varun Dhawan (@Varun_dvn) July 18, 2017वास्तविक सोहळ्यादरम्यान ‘भाई-भतीजा’ वादावर कंगनाने केलेल्या कमेण्टवर करण जोहरसह वरुण आणि सैफनी तिची चांगलीच खिल्ली उडविली. मात्र यानंतर करणला नेटिझन्सच्या रोशाचा सामना करावा लागला. त्याला यावरून ट्रोल करण्यात आले. मात्र करणवर याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण यानंतर तो लगेचच मित्रांबरोबर पार्टी करताना बघावयास मिळाला. परंतु यामुळे कंगना दुखावली गेल्याची जाणीव कदाचित वरुणला झाली. त्याने ट्विटच्या माध्यमातून कंगनाची जाहीर माफी मागितली. 

आयफात जेव्हा करण आणि सैफ सूत्रसंचालन करीत होते. तेव्हा कंगनाच्या वादग्रस्त ‘भाई-भतीजा’वादाची जाहीरपणे खिल्ली उडविली गेली. कंगनाने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये करणवर इंडस्ट्रीत ‘भाई-भतीजा’वादाला फोडणी देत असल्याचा आरोप केला होता. कंगनाचा हाच मुद्दा आयफाच्या मंचावर चर्चिला गेला. जेव्हा मेटलाइफ स्टेडियमच्या मंचावर वरुण त्याच्या ‘ढिशूम’ या चित्रपटासाठी बेस्ट कॉमेडी अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला तेव्हा सैफने त्याला चेष्टा मस्करीत म्हटले ‘तो (वरुण) फिल्म इंडस्ट्रीत तिच्या वडिलांमुळे आहे.’ वरुणनेदेखील सैफला जशास् तसे उत्तर देताना म्हटले की, ‘तू पण तुझ्या आईमुळे (शर्मिला टॅगोर) इंडस्ट्रीत आहेस.’ पुढे करणनेदेखील या दोघांच्या तू-तू मैं-मैं मध्ये उडी घेतली. ‘मीदेखील माझ्या वडिलांमुळे (यश जोहर) येथे आहे.’



पुढे वरुणने पुन्हा करणला कंगनाचे नाव घेत म्हटले की, ‘तुमच्या एका चित्रपटात बोले चुडियां, बोले कंगना हे गाणे आहे’ त्यावर करण लगेच पुटपुटला ‘कंगना न म्हटले तरी चालेल कारण कंगना खूपच बोलते’ करणच्या याच वाक्यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र वरुणला त्याने केलेली चूक कदाचित समजली असावी. म्हणून त्याने जाहीरपणे ट्विटच्या माध्यमातून कंगनाची माफी मागितली. वरुणने जरी माफी मागितली असली तरी, हे प्रकरण एवढ्यावरच संपेल असे दिसत नाही. कारण या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Varun Dhawan and Saif Ali Khan fall in the coffin of 'Queen' in IPL; Apologize for asking for Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.