नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढ सोनम कपूर पती आनंद आहुजासह जपानमध्ये आपला क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. आनंदही आपल्या लेडी लव्हसह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.  सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी  भेट देत तेथील सौदर्यं त्यांची संस्कृती कॅमे-यात कॅप्चर करताना पाहायला मिळतायेत. सोनम आणि आनंदच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. 8 मे 2018 दोघे लग्नबंधनात अडकले होते.


सोनम व आनंद आज बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. अगदी अलीकडे आनंद सर्वांसमोर सोनमच्या बुटाची लेस बांधत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते.  नवरा असावा तर असा,अशी भावना हे फोटो पाहून उमटली होती.  आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे.  आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश आहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.


२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली भेट झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेन्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रिण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम  आनंद पहिल्यांदा भेटले.

आनंद आणि सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले,त्या दिवसापासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली. सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज यादगार सरप्राईज ठरले. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते. त्यामुळेच सोनम आनंदच्या प्रेमात पडली होती. 
 


Web Title: Vacation Mode On Sonam Kapoor makes fun with husband Anand Ahuja in Japan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.