vaani kapoor troubled by crazy fan actress filed versova police station against him | ‘त्याला’ला पाहून वाणी कपूरला भरली धडकी, थेट पोलिस ठाण्याकडे वळवली गाडी!
‘त्याला’ला पाहून वाणी कपूरला भरली धडकी, थेट पोलिस ठाण्याकडे वळवली गाडी!

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अभिनेत्री वाणी कपूर आपल्या बोल्ड स्वभावासाठी ओळखली जाते. पण अलीकडे असे काही घडले की, ‘बोल्ड’ वाणीची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मग काय, वाणी थेट पोलिस ठाण्यात पोहोचली.
अलीकडे वाणी अर्ध्या रात्री आपल्या कारने प्रवास करत होती. वर्सोवा ते वांद्रे या प्रवासादरम्यान एका चाहत्याचे वाणीकडे लक्ष गेले आणि त्याने बाईकने तिचा पाठलाग सुरु केला. आधी वाणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण परतीच्या प्रवासातही हा बाईकस्वार वाणीच्या गाडीमागे पडला. वाणीच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवून त्याच्यापासून पिच्छा सोडवण्याचे प्रयत्न केलेत. पण याचा काहीही फायदा झाला नाही.

एका क्षणाला वाणी इतकी घाबरली की, तिने ड्रायव्हरला गाडी थेट पोलिस ठाण्याकडे वळवण्यास सांगितली. वाणीच्या आदेशानुसार, ड्रायव्हरने गाडी पोलिस ठाण्यासमोर उभी केली. यानंतर वाणीने पोलिसांसमोर आपबीती सांगत तक्रार नोंदवली. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान मध्यरात्री वाणीचा पाठलाग करणाºया त्या चाहत्याचे नाव समीर खान असल्याचे समजले.


सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच यशराज फिल्मच्या ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. ‘शमशेरा’ एक पीरिएड ड्रामा आहे. रणबीर यात दरोडेखोराच्या भूमिकेत  असून बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


Web Title: vaani kapoor troubled by crazy fan actress filed versova police station against him
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.