कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:53 AM2020-03-25T10:53:30+5:302020-03-25T10:57:42+5:30

का भडकले चिंटू चाचा?

user try to troll rishi kapoor he gave the solid reply to him tweet viral-ram |  कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर

 कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे माझ्या देशाची वा माझ्या लाईफ स्टाईलची खिल्ली उडवणा-यांना मी डिलीट करेल, असेही त्यांनी सुनावले.

 पीएम मोदींच्या निर्देशानंतर सर्व बॉलिवूड स्टार्सनी स्वत:ला घरात कैद करून घेतले आहे. आजपासून 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी याचे समर्थन केले आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही याला अपवाद नाही. ट्विटरवर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह असलेल्या ऋषी कपूर यांनी आपल्या सर्व चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पण याचदरम्यान एका सोशल मीडिया युजरने ऋषी कपूर यांना असा काही डिवचणारा प्रश्न विचारला की ऋषी कपूर भडकले आणि या डिवचणा-या युजरला त्यांनी सणसणीत उत्तर दिले.


 
आता हे सगळे काय प्रकरण आहे, युजरने असा काय प्रश्न केला की ऋषी कपूर इतके भडकले, ते जाणून घेऊ या... तर त्याचे झाले असे की, मोदींनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा करताच एका युजरने ऋषी कपूर यांनी ट्विट केले. ‘एकासाठी सगळे, सगळ्यांसाठी एक. आपल्याला तेच करायचे जे आपल्याला करायचेय. आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपण सगळे एकमेकांना बिझी ठेऊ. चिंतेचे कुठलेही कारण नाही. घाबरू नका. पीएमजी चिंता करू नका़ आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.


त्यांचे हे ट्विट वाचून एका युजरने ऋषी कपूर यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘दारू का कोटा फुल है ना चिंटू चाचा,’ असा झोंबणारा सवाल या युजरने केला. युजरचा हा सवाल पाहून ऋषी कपूर यांचा पारा जाम चढला. मग काय, ‘ये एक और इडियट,’ असे या युजरला त्यांनी सुनावले.

 इतकेच नाही तर माझ्या देशाची वा माझ्या लाईफ स्टाईलची खिल्ली उडवणा-यांना मी डिलीट करेल. सावध राहा आणि हा इशारा समजा़ ही गंभीर स्थिती आहे, असेही त्यांनी सुनावले.

Web Title: user try to troll rishi kapoor he gave the solid reply to him tweet viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.