बापरे बाप, उर्वशी रौतेलाने हातात घातलेल्या ब्रेसलेटची किंमत माहितीय? आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:55 AM2021-02-06T11:55:36+5:302021-02-06T12:00:38+5:30

ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. आपल्या स्टाइल आणि फॅशनने कॅमे-यांच्या नजरा आकर्षित करुन घेण्यात उर्वशी रौतेला नेहमीच यशस्वी ठरते.

Urvashi Rautela recently uploaded a video flaunting her super expensive bracelets Know The Price | बापरे बाप, उर्वशी रौतेलाने हातात घातलेल्या ब्रेसलेटची किंमत माहितीय? आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

बापरे बाप, उर्वशी रौतेलाने हातात घातलेल्या ब्रेसलेटची किंमत माहितीय? आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

googlenewsNext

स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असून प्रत्येकजण हटके स्टाइल करत लक्ष वेधून घेत असतो.बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा. आपली फॅशन आणि स्टाईलबाबत उर्वशी रौतेलाही बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. आपल्या स्टाइल आणि फॅशनने कॅमे-यांच्या नजरा आकर्षित करुन घेण्यात उर्वशी नेहमीच यशस्वी ठरते. तिने कायमच आपली स्टाइल जपली आहे.  

रिल लाईफ असो किंवा रिअल उर्वशीच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. तिने परिधान केलेल्या ड्रेस असो किंवा मग हटके लिपस्टिकपासून ते एखाद्या सोहळ्यात परिधान केलेल्या आकर्षक डिझायनर  ज्वेलरी प्रत्येकाचीच खास चर्चा होते.आता पुन्हा एकदा फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 

सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे.  उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशीने सोन्याचे हिऱ्याने सजवलेलेचे ब्रेसलेट घातले आहे. या व्हिडीओत ती हातातले ब्रेसलेट दाखवताना दिसतेय.  या ब्रेसलेटची किंमत जाणून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

 

या डोळे दिपवणा-या आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेणा-या ब्रेसलेटची किंमत तब्बल ७० लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिने पुन्हा आपल्या या मनमोहक आणि आकर्षक स्टाइलने सा-यांचीच मने जिंकली असणार हे मात्र नक्की. 

तिच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर उर्वशी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सिरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डाची पत्नी पूनम मिश्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. थ्रिलर मालिका पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे. 'सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. उर्वशी २०२१ मध्ये विविध भूमिका साकारत रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Urvashi Rautela recently uploaded a video flaunting her super expensive bracelets Know The Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.