Limited Edition...! उर्वशी रौतेलाचा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 08:00 AM2020-02-06T08:00:00+5:302020-02-06T08:00:02+5:30

चाहत्यांना घायाळ करतील असे फोटो....

urvashi rautela hot photos in amazon filmfare awards 2020 | Limited Edition...! उर्वशी रौतेलाचा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’

Limited Edition...! उर्वशी रौतेलाचा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’

googlenewsNext
ठळक मुद्देउर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नाही म्हणायला तिला चित्रपट मिळतात, पण या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स तेवढेच चर्चेत राहतात. अलीकडे तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून या चित्रपटात उर्वशीला घेतलेच का? असा प्रश्न हा अनेकांना पडला होता. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा रंगली होती. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, तिच्या काही हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.


उर्वशीने हे फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. यात उर्वशीचा लूक खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.


  मी जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी लिमिटेड एडिशन आहे, ( I’m not weird; I’m a limited edition ...)असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे.


उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.


‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.  भाग जानी, सनम रे अशा चित्रपटातही ती झळकली.

Web Title: urvashi rautela hot photos in amazon filmfare awards 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.