ठळक मुद्दे उर्वशीच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसणार आहे. अनीस अज्मी दिग्दर्शित या मल्टिस्टारर चित्रपटात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे.

 आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट 2019 मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. याचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. होय, या चर्चेचे कारण म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. होय, नुकत्याच रंगलेल्या भारत-पाक सामन्यादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मैदानावर हजेरी लावली. उर्वशी रौतेला ही सुद्धा यावेळी मैदानावर टीम इंडियाला चीअर करण्यासाठी हजर होती. याचदरम्यान उर्वशीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या प्रतिमेसोबत एक फोटो घेतला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
पण उर्वशीने हा फोटो पोस्ट केला आणि ती ट्रोल झाली. हा फोटो पाहून लोकांनी मजेशीर कमेंट्स दिल्यात.

‘दुसरी लडकी के साथ विराट कोहली, अनुष्का शर्मा विराट भाई की खबर लेना,’असे एका युजरने लिहिले. एका युजरने तर हा फोटो पाहून, ‘विराट कोहली को ना बिगाडो,’ असा अजब सल्ला दिला. अन्य एका युजरनेही यावरून उर्वशीची फिरकी घेतली.

‘जेव्हा तुम्ही ख-या विराट कोहलीला अफॉर्ड करू शकत नाही,’ असे त्याने लिहिले. एकाने तर आणखीच मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘मागे पाहा मागे अनुष्का लाटणे घेऊन उभी आहे,’असे त्याने लिहिले. विराट कोहली तुझा जीजाजी आहे, अशा शब्दांत एका युजरने उर्वशीला समजवण्याचा प्रयत्न केला.
एकंदर काय तर उर्वशीच्या या फोटोने अनेकांचे मनोरंजन केले. उर्वशीच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसणार आहे. अनीस अज्मी दिग्दर्शित या मल्टिस्टारर चित्रपटात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे.

Web Title: urvashi rautela brutally trolled for posing with virat kohli statue india pakistan world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.