कोरोना व्हायरसच्या थैमानामध्ये उर्वशी रौतेलाचा चर्चेत आला हॉट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 02:28 PM2020-03-25T14:28:07+5:302020-03-25T14:28:46+5:30

उर्वशीचा हा व्हिडीओ जुना असला तरीही तिच्या चाहत्यांमध्ये सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.

urvashi rautela beach video viral actress playing with water on internet Tjl | कोरोना व्हायरसच्या थैमानामध्ये उर्वशी रौतेलाचा चर्चेत आला हॉट व्हिडिओ

कोरोना व्हायरसच्या थैमानामध्ये उर्वशी रौतेलाचा चर्चेत आला हॉट व्हिडिओ

googlenewsNext

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिला फोटो व व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यातही ती ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल देखील सुनावते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील क्वारंटाईनमध्ये आहे. पण तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात आता तर ती तिच्या हॉट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बिकिनीमध्ये समुद्रात आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडीओ खरं तर खूप जुना आहे. मात्र उर्वशी सध्या होम क्वारंटाईनच्या काळात तिचे जुने दिवस आठवत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, Me taking bath in quarantine like.

उर्वशीचा हा व्हिडीओ जुना असला तरीही तिच्या चाहत्यांमध्ये सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमधील तिच्या अदांवर तर सर्व घायाळ झालेले पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये ती समुद्राच्या पाण्यात धम्माल मस्ती करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीने आपल्या चाहत्यांना घरात राहून व्यायाम कसा करावा हे तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शिकवण्यास सुरुवात देखील केली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कसरत आणि स्ट्रेचिंग घरबसल्या कसे करायचे हे सांगितले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून पहिल्याच दिवशी २० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

 

Web Title: urvashi rautela beach video viral actress playing with water on internet Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.