‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 03:20 PM2018-12-17T15:20:04+5:302018-12-17T15:20:49+5:30

टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत.

urvashi dholakias son to work with aayushmann khurranas next film with ekta kapoor | ‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री!

‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात नुसरत भरूचा आणि आयुष्यमान खुराणा लीड रोलमध्ये दिसणार आहेत. अलीकडे या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही रिलीज झाले होते. राज शान्डिल्य हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. वासू भगनानीच्या ‘हमशक्ल’ या चित्रपटात क्षितीज व सागर झळकले होते. सैफ अली खान व रितेश देशमुख हे या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. आता त्यांना साथ मिळाली आहे ती, एकता कपूरची. होय, एकता कपूरच्याच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेनेचं क्षितीज व सागरची मॉम उर्वशीला नवी ओळख दिली होती. या मालिकेत निगेटीव्ह कॅरेक्टर साकारूनही कोमोलिका उर्फ उर्वशी ढोलकिया प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. आता उर्वशीच्या मुलांनाही एकता कपूरच्या कंपूत एन्ट्री मिळाली आहे.

एकता कपूरच्या बॅनरखाली बनलेल्या एका चित्रपटात क्षितीज व सागरला संधी मिळाली आहे. अर्थात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. होय, एकता कपूरच्या आगामी ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात क्षितीज व सागर असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडतील. निश्चितपणे दोघांसाठीही ही मोठी संधी आहे.


ड्रिम गर्ल’ या चित्रपटात नुसरत भरूचा आणि आयुष्यमान खुराणा लीड रोलमध्ये दिसणार आहेत. अलीकडे या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही रिलीज झाले होते. राज शान्डिल्य हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. (राज शान्डिल्य यांनी यापूर्वी ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या हिट शोचे राईटर म्हणून काम केले आहे. ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. )आयुष्यमानचे यंदा आलेले ‘अंधाधून’ व ‘बधाई हो’ हे दोन्ही चित्रपट सुपरडुपर हिट झालेत. त्यामुळे आयुष्यमान आता ए- लिस्ट स्टार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आता केवळ या ए लिस्ट स्टारसोबत काम करण्याची संधी क्षितीज व सागर कशी कॅश करतात, तेच बघायचेय.

Web Title: urvashi dholakias son to work with aayushmann khurranas next film with ekta kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.