'शिप ऑफ थिशियस' व 'तुंबाड' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सोहम शाह आणि 'पिंक', 'उरी', 'ब्लॅकमेल' व 'इंदु सरकार' यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारी लवकरच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे दिग्दर्शक पवन कृपलानी यांच्या लघुपटात झळकणार आहेत. 


सोहम शाह व किर्ती कुल्हारी या दोघांनी लघुपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले. अद्याप या लघुपटाची कथा व विषय समजू शकलेले नाही. पण सोहम व किर्तीसारखे कलाकार एकत्रित प्रोजेक्टवर काम करत आहेत म्हणजे हा लघुपट हटके असणार आहे. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

आतापर्यंच सोहम शाहने प्रेक्षकांना तुंबाड, शिप ऑफ थिशियस यांसारख्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकला आहे. मात्र त्याला खरी ओळख तुंबाड चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबत समीक्षकांची पसंती मिळाली.

आता सोहमने लघुपटाचा भाग बनून हे चित्र स्पष्ट केले की त्याला कोणत्याही माध्यमात काम करायला आवडेल. 


तर दुसरीकडे, किर्ती कुल्हारीने पिंक चित्रपटातील आपल्या अभिनयातून सर्वांनाच भुरळ पाडली. उरी मध्ये तिची छोटी पण महत्त्वाची भूमिका होती. जी प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. फोर मोर शॉट्स प्लीझ या वेबसीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारून तिने कोणतीही भूमिका सक्षम साकारू शकते हे सिद्ध केले. या लघुपटाचे शूटिंग नुकतेच पार पडले आणि शूटिंग संपल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 


लवकरच ते या लघुपटाची घोषणा करणार आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी करत आहे. किर्ती व सोहम यांना एकत्रित काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 


Web Title: 'Uri' Fame Kirti Kulari will appear with the actor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.