twitterati trolls makers divya khosla kumar music video yaad piya ki aane lagi | तुम लोगों ने गाणे की बँड बजा दी...! या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन ऐकून युजर्स लावला डोक्याला हात!!
तुम लोगों ने गाणे की बँड बजा दी...! या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन ऐकून युजर्स लावला डोक्याला हात!!

ठळक मुद्देदिव्या कुमार खोसला ही भूषण कुमारची पत्नी आहे. 2005 मध्ये तिने भूषण कुमारसोबत लग्नगाठ बांधली.

गुलशन कुमार यांची सून दिव्या कुमार खोसलाचे ‘याद पिया की आने लगी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. एकीकडे हे गाणे युट्यूबवर ट्रेंड करतेय. दुसरीकडे या गाण्यावरून मेकर्सला ट्रोल केले जातेय. या गाण्याला ट्रोल करणा-या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘याद पिया की आने लगी’ हे ओरिजनल गाणे दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने गायलेले आहे. आता हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. दिव्या खोसला कुमार हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या रिमिक्स व्हर्जनला नेहा कक्करने  आवाज दिला आहे. पहिल्या 24 तासांत या गाण्याला कोट्यवधी व्ह्युज मिळालेत.

या रिक्रिएट केल्या गेलेल्या गाण्याची सुरवात 3010 पासून होते. गाण्याच्या सुरुवातीला एक रोबो दिसतो. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ या रोबोला एक डिवाईस मिळते आणि दिव्या खोसलाची एन्ट्री होते. कॉलेज स्टुडंट असलेल्या दिव्याची स्टोरी या गाण्यात दिसते.
तूर्तास या गाण्याला प्रचंड ट्रोल केले जातेय. 

श्रीमी वर्मा नामक युजरने या गाण्याची क्लिप पोस्ट करत, ‘हे रिमिक्स गाणे ऐकून मला ताप आला,’ असे लिहिले आहे. एका युजरने गाण्यात दाखवलेल्या रोबोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘हा रोबो पिक्सर सारखा दिसतो. काय तुम्ही डिज्नीसोबत याच्या कॉपीराईटबद्दल बोललात?’ असा सवाल या युजरने केला आहे.


बचपन की सारी यादें खराब कर दी यार, असे एका युजरने या गाण्याला ट्रोल करताना लिहिले आहे. तर अन्य एका युजरने, ‘हे गाणे माझ्या आवडीचे गाणे होते. तुम्ही त्याचा बँड वाजवला,’ अशा शब्दांत या गाण्याला ट्रोल केले आहे.
दिव्या कुमार खोसला ही भूषण कुमारची पत्नी आहे. 2005 मध्ये तिने भूषण कुमारसोबत लग्नगाठ बांधली.

Web Title: twitterati trolls makers divya khosla kumar music video yaad piya ki aane lagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.