Twitter User Asks if Nick Jonas Divorced Jameela Jamil, Priyanka Chopra Reacts | प्रियंका चोप्रा निकसोबत घटस्फोट घेणार? चाहत्याच्या घोळाने देसी गर्ल संतापली

प्रियंका चोप्रा निकसोबत घटस्फोट घेणार? चाहत्याच्या घोळाने देसी गर्ल संतापली

ठळक मुद्देखरे तर जमीला आणि प्रियंका यांच्यात अजिबात साम्य नाही. पण तरिही या चाहत्याने घोळ केला.

प्रियंका चोप्रानिक जोनास दोघेही आनंदाने संसार करत आहेत. पण अनेकदा लोक वयातील फरकामुळे या दोघांना ट्रोलही करतात. पण  निक व प्रियंका कधीच ट्रोलर्सची पर्वा करत नाहीत. सध्या प्रियंका एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सध्या प्रियंकाच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता या चर्चेची सुरुवात कशी झाली तर  चाहत्याच्या एका ट्विटमुळे. 

होय, या चाहत्याने असा काही गोंधळ घातला की, खुद्द प्रियंकाही हैराण झाली. या चाहत्याने काय केले तर, प्रियंका चोप्रा समजून भलत्याच अभिनेत्रीला, निक व तुझा घटस्फोट होणार आहे का? असा प्रश्न केला. ही अभिनेत्री कोण तर ब्रिटीश अ‍ॅक्ट्रेस जमीला जमील. 
खरे तर जमीला आणि प्रियंका यांच्यात अजिबात साम्य नाही. पण तरिही या चाहत्याने घोळ केला. पण खरा घोळ घातला त्याच्या प्रश्नाने. त्याच्या या प्रश्नानंतर प्रियंका  व निकच्या घटस्फोटाची चर्चा सुुरू झाली. 
युजरच्या या प्रश्नानंतर प्रियंका व जमीला जलील दोघींनाही खुलासा करावा लागला.

काय म्हणाली जमीला जमील?

 प्रियंंका चोप्रा ही भारतीय महिला माझ्यासारखी दिसत नाही. आम्ही एकमेकांपेक्षा फारच वेगळे दिसतो. मला वाटतं निक आणि प्रियांका एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत, असे ट्विट करुन जमीलाने हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. 

प्रियंकाचा ‘पंच’!

चाहत्याने घातलेला घोळ पाहून प्रियंकालाही खुलासा करावा लागला. तिने जमीलाचे ट्विट रिट्विट करत तिच्या वक्तव्याला आपली सहमती दर्शवली. शिवाय काहीसा संतापही व्यक्त केला. अभिनेत्रींचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Twitter User Asks if Nick Jonas Divorced Jameela Jamil, Priyanka Chopra Reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.