ठळक मुद्देट्विंकल खन्नाने या फोटोसोबत एक छानशी पोस्ट देखील लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, मी शाळेत माझ्या शिक्षकांसारखीच हेअर स्टाईल केली होती. माझ्यासाठी शिक्षण घेणे आणि त्यातही एक चांगली विद्यार्थी बनणे खूप महत्त्वाचे होते.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच सामाजिक प्रश्नांना सोशल मीडियाद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असते. मुलींना देखील शिक्षण मिळाले पाहिजे हे आपले मत मांडत ट्विंकल खन्नाने तिच्या शालेय जीवनातील एक फोटो तिच्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला आहे. ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोत ती खूप वेगळी दिसत असल्याने तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.

ट्विंकल खन्नाने या फोटोसोबत एक छानशी पोस्ट देखील लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, मी शाळेत माझ्या शिक्षकांसारखीच हेअर स्टाईल केली होती. माझ्यासाठी शिक्षण घेणे आणि त्यातही एक चांगली विद्यार्थी बनणे खूप महत्त्वाचे होते. शिक्षणामुळेच मी एक स्वतंत्र मुलगी बनू शकले. शाळेतील पाच मधील तीन मुली आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण अर्धवट सोडताना दिसतात. असे का? आपल्या मुलींना शिक्षण देऊया... आणि मी टॅग करते, सोनम कपूर, ताहिरा कश्यप आणि अक्षय कुमार यांनी त्यांचे शालेय जीवनातील फोटो पोस्ट करावेत.

सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या संस्थेची ट्विंकल आर्टिस्ट अ‍ॅम्बेसेडर असून असून मुलांच्या आरोग्याकडे आणि विशेषतः मुलींनी मानसिक पाळीच्या काळात स्वच्छता राखण्याकडे ही संस्था लक्ष देते. 

ट्विंकलच्या दुसऱ्या पुस्तकाच्या लाँचच्यावेळी ट्विंकलने अतिशय लहान वयात लिखाण करायला सुरुवात केली असल्याचे सांगितले होते. आज मी लेखिका म्हणून माझी एक ओळख निर्माण केली आहे. त्याचमुळे आज मला एखाद्या स्टारची मुलगी अथवा एखाद्या स्टारची पत्नी म्हणून लोक ओळखत नाहीत तर माझी एक वेगळी ओळख आहे असे तिने म्हटले होते.

ट्विंकलने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला केव्हाच रामराम ठोकला आहे. पण एक लेखिका म्हणून तिने आज तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. आज घर आणि करियर या दोन्ही गोष्टी ती खूपच चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. ट्विंकलला एक अभिनेत्री म्हणून यश मिळाले नसले तरी एक लेखिका म्हणून तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. तिच्या फनीबोन्स या पुस्तकाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

Web Title: Twinkle Khanna shares her school pic to make a point about women’s education, nominates Akshay Kumar, Sonam Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.