व्हायरल झालं Taapsee Pannu हे ट्विट, म्हणाली - 'कुणाला इतकंही घाबरवू नका की भीतीच संपेल...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:10 PM2020-09-07T12:10:44+5:302020-09-07T12:10:55+5:30

तापसी पन्नूच्या रियाला सपोर्ट करणाऱ्या ट्विटनंतर तिचं आणखी ट्विट व्हायरल झालं आहे.

This tweet of Taapsee Pannu went viral on social media | व्हायरल झालं Taapsee Pannu हे ट्विट, म्हणाली - 'कुणाला इतकंही घाबरवू नका की भीतीच संपेल...'

व्हायरल झालं Taapsee Pannu हे ट्विट, म्हणाली - 'कुणाला इतकंही घाबरवू नका की भीतीच संपेल...'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या ट्विट्समुळे चांगलीच चर्चेत आहे. तापसीने रविवारी केलेलं एक ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. तापसीने तिच्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की,  'किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए... और जिसको डर नहीं होता न उससे थोड़ा डरना चाहिए.' ट्विटरवर लोकांना असं वाटत आहे की, तिने हे ट्विट सुशांत सिंह राजपूतची रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये केलंय.

तापसीच्या ट्विटवर लोक आपापली मते मांडत आहेत. याआधी तापसीने एक ट्विट केले होते की, 'प्रत्येक महिला जी त्यांच्यापेक्षा सक्सेसफुल पुरूषासोबत आहे. ती गोल्ड डिगर नसते. सध्या सत्य आणि एजन्सी आपलं काम करत आहेत. एकावेळी एकच पाउल'.

तर दुसरीकडे एका दुसऱ्याा ट्विटमुळे तापसी पन्नूला सोसल मीडियावर ट्रोल केलं जातंय. या ट्विटमध्ये तापसीने रियाला सपोर्ट केला होता. तिने लिहिले होते की, 'मी पर्सनली ना ओळखत होते ना रियाला, पण हे नक्की माहीत आहे की, न्यायपालिकेआधीच कुणाला दोषी सिद्ध करणे चुकीचं आहे. कायद्यावर विश्वास ठेवा'.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स प्रकरणाबाबत रिया चक्रवर्तीची आज पुन्हा चौकशी केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया आणि इतर आरोपींचा आज आमना-सामना होऊ शकतो. एनसीबीसमोर रविवारी चौकशीदरम्यान रियाने दावा केला होता की, सुशांत ड्रग्स घेत होता. रियाने दुसरा मोठा दावा केला की, सुशांत वीड म्हणजे चरस घेत होता.

हे पण वाचा :

रिया चक्रवर्तीला सपोर्ट करणं तापसी पन्नूला पडलं महागात, वाचा लोकांनी कसं केलं ट्रोल?

अखेर रियानं ३ मोठी गुपितं उघड केली; एनसीबीसमोर दिली महत्त्वाची कबुली

Web Title: This tweet of Taapsee Pannu went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.