ठळक मुद्देपियुषचं नुकतंच 'तुझे जाना है तो जा' हे सिंगल साँग रिलीज झाले आहेपियुषने आपल्या सूरले आवाजाने चार चाँद लावले आहेत

गायक पियुष अंभोरेने 'व्हॉइस ऑफ इंडिया' या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केले आहे. पियुषचं नुकतंच 'तुझे जाना है तो जा' हे सिंगल साँग रिलीज झाले आहे. या गाण्यात पियुषने आपल्या सूरले आवाजाने चार चाँद लावले आहेत. ऐवढेच नाही तर या गाण्याचे म्युझिकदेखील पियुषने दिले आहे. 


पियुषचा जन्म परभणीमध्ये झाला असून तो मुळचा शिंगी या हिंगोली आणि शेगांवजवळील आहे. पियुषलहानपणी नागपूर आणि औरंगाबादमध्येदेखील राहिला आहे. पियुषच्या 'तुझे जाना है तो जा' या गाण्याबाबत बोलायचे झाले तर हे एक रोमाँटिक साँग आहे. प्रीत सिंग भुल्लर दिग्दर्शित या साँगमध्ये पियुषसोबत श्रुती तारे दिसतेय. या गाण्याच्या माध्यमातून एक प्रेमकथा उलगडण्यात आली आहे.   


या गाण्याबाबत बोलताना पियुष म्हणला, "मी योग्य गाण्याची वाट पाहात होतो कारण, मी परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत मला एक योग्य दिशा मिळत नाही, तोपर्यंत मी त्या विषयाला हात घालत नाही. हे एक रॉक साँग आहे जे सध्या खूप कमी ऐकायला मिळते. ९०च्या दशकात रॉक साँगपेक्षा पॉपचे जास्त वर्चस्व होते. सध्या जुन्या गोष्टी रिक्रिएट करण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि मला ही त्याचा एक भाग व्हायला आवडेल. कुणास ठाऊक कदाचित भविष्यात हा बदल स्वीकारला जाईल तसेच मला असं वाटत हा बदल स्वीकारण्यासाठी लोक तयार आहेत.''  


निर्माते सुरज पालवाडे आणि प्रीत याच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल पियूष म्हणतो "या टीमबरोबर काम करणे खरचं खूप चांगला अनुभव आहे. 'तुझे जाना है तो जा' हे गाणं जेवढं माझं आहे तेवढेचं ते सूरज आणि प्रीतचं सुद्धा आहे.''   ४८फ्रेम्स प्रॉडक्शनच्या बॅनरच्या अंतर्गत सूरज पालवाडे यांनी या गाण्याची निर्मिती केली असून झी म्युझिकने हे रिलीज केले आहे.


Web Title: Tujhe jaana hai toh jaa sung by piyush ambhore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.