राधिकाची फोटो फ्रेम व त्याला घातलेला हार पाहून चाहत्यांना बसला धक्का, जाणून घ्या यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:08 PM2020-01-06T13:08:26+5:302020-01-06T13:08:49+5:30

राधिकाचा इंस्टाग्रामवरील फोटो पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत.

The truth behind this is that fans are shocked to see Radhika's photo frame and necklace worn | राधिकाची फोटो फ्रेम व त्याला घातलेला हार पाहून चाहत्यांना बसला धक्का, जाणून घ्या यामागचं सत्य

राधिकाची फोटो फ्रेम व त्याला घातलेला हार पाहून चाहत्यांना बसला धक्का, जाणून घ्या यामागचं सत्य

googlenewsNext


मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. ती तिच्या भूमिकेशिवाय सोशल मीडियावरील बोल्ड व सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांचे लाईक्स व कमेंट्स येत असतात. मात्र नुकताच तिचा इंस्टाग्रामवरील फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. या फोटोत तिच्या फोटो फ्रेमला हार घातलेला असून मेणबत्त्या पेटवलेल्या दिसत आहेत. मात्र या फोटोतील एक खटकणारी गोष्ट म्हणजे या फोटोत विक्रमादित्य मोटवाणी स्माईल करताना दिसतो आहे.


राधिका आपटेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राधिकाच्या फोटोला हार घातलेला फोटो शेअर केला आहे. ज्यात विक्रमादित्य मोटवाणीदेखील दिसतो आहे. तिने हा फोटो शेअर करत मला काय सापडले असं म्हटलं आहे. 


हा फोटो सेक्रेड गेम्स या लोकप्रिय सीरिजच्या बिहाइंड सीनमधील आहे. 


राधिकाने लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज सेक्रेड गेेम्समध्ये अंजली माथुरची भूमिका साकारली होती. पहिल्या सीझनमध्ये खलनायक मॅल्कॉम मौराद तिची हत्या करतो. मात्र राधिकाने सेक्रेड गेम्समध्ये साकारलेली डॅशिंग अंजलीची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.


राधिका आपटेने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे.

राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो.

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: The truth behind this is that fans are shocked to see Radhika's photo frame and necklace worn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.