ठरलं तर मलायका अरोरा अर्जुनसह करणार ही गोष्ट, KISS करतानाचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 12:29 PM2020-01-02T12:29:31+5:302020-01-02T12:30:35+5:30

गेले कित्येक दिवस आपल्यातल्या प्रेमाच्या नात्याबद्दल दोघे नकार देत होते. मात्र आता दोघंही खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतायत.

Trending: Malaika Arora And Arjun Kapoor's share a kiss of love On New Year | ठरलं तर मलायका अरोरा अर्जुनसह करणार ही गोष्ट, KISS करतानाचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

ठरलं तर मलायका अरोरा अर्जुनसह करणार ही गोष्ट, KISS करतानाचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

googlenewsNext

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिमेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नव्हतं. वर्षाच्या सुरूवातीलाच खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत मलायका आणि अर्जुने आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय. यापूर्वी हे दोघे  एकत्र असले तरी मीडियाच्या कॅमे-यात कधीच एकत्र आले नव्हते. पहिल्यांदाच हे लव्हबर्डस एकत्र पाहायला मिळाले.

पहिल्यांदाच  या दोघांच्या आतापर्यंत रंगलेल्या अफेअरच्या फक्त चर्चाच होत्या मात्र या फोटोंमुळे  या दोघांचं नातं किती क्लोज आहे हे आता सा-या जगासमोर आले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या दोघांचा फोटो समोर आला आहे. यांत पहिल्यांदाच दोघे किती क्लोज आहेत हे स्पष्ट होते आहे. गेले कित्येक दिवस आपल्यातल्या प्रेमाच्या नात्याबद्दल दोघे नकार  देत होते.  मात्र आता दोघंही खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतायत. 


दोघंही रोमँटिक पोझमध्ये पाहायला मिळत असून मलायकाने तर चक्क अर्जुनला किस केल्याचे पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर हा फोटो खुद्द मलायकानेच सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.  "सूरज, सितारे, रोशनी, खुशियां.... 2020." या फोटोला असे कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या लग्नाचा बार उडवतील असेच दिसतंय. 


सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली.

Web Title: Trending: Malaika Arora And Arjun Kapoor's share a kiss of love On New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.