ठळक मुद्देदिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून  हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्याआधी ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती.

फक्त उण्यापु-या तीन वर्षांत दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. या तीन वर्षांत दिशाने प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली. अगदी स्वत:च्या लूकपासून तर अभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वत:त अधिकाधिक सुधारणा करण्यावर तिचा भर राहिला. गत तीन वर्षांत दिशाच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घातला. पण आज आम्ही दिशाचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. दिशाचे हे जुने फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

दिशा अतिशय सुंदर आहे, यात काहीही दुमत नाही. पण हे सौंदर्य मिळवण्यासाठी दिशाने प्रचंड मेहनत घेतली. तिचे जुने फोटो याचा पुरावा आहेत.

हा फोटो दुस-या कुणाचा नाही तर दिशाचा आहे. हा फोटो पाहून ही दिशा यावर क्षणभर विश्वास बसणार नाही.

दिशा सध्या बरीच स्लीम आहे. पण आधी ती तशी नव्हती. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

या फोटोत दिशा एखाद्या जुन्या हिरोईनसारखी दिसतेय. ग्रीन कलरची साडी आणि केसांत माळलेले फुल. तिला पाहिल्यानंतर तुम्हाला टीना मुनीमची आठवण आली नसेल तर नवल.

या फोटोत दिशा थोडीफार ओळखीची वाटतेय. पण तरीही आजची दिशा आणि त्यावेळची दिशा यात बराच फरक आहे.

यात दिशा बंगाली बाला दिसतेय. या फोटोनंतर दिशाचे आत्ताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही चाट पडाल.


 

दिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून  हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्याआधी ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. यानंतर जॅकी चॅनसह ‘कूंग फू योगा’ या सिनेमात ती झळकली होती. पुढे ‘बागी-२’ सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली होती.‘बागी-२’ मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात दिशाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 


Web Title: transformation of disha patani will blow your mind away view old photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.