Jayeshbhai Jordar: सामाजिक मुद्दा उत्तमरित्या हाताळणारा 'जयेशभाई जोरदार'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास रणवीर पुन्हा यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:14 PM2022-04-19T12:14:35+5:302022-04-19T12:14:49+5:30

Jayeshbhai Jordar: 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात रणवीरने एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारली आहे.

trailer release of ranveer singh film jayeshbhai jordaar | Jayeshbhai Jordar: सामाजिक मुद्दा उत्तमरित्या हाताळणारा 'जयेशभाई जोरदार'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास रणवीर पुन्हा यशस्वी

Jayeshbhai Jordar: सामाजिक मुद्दा उत्तमरित्या हाताळणारा 'जयेशभाई जोरदार'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास रणवीर पुन्हा यशस्वी

googlenewsNext

आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडण्यास यशस्वी ठरणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (ranveer singh). उत्तम अभिनयशैलीसह बिंधास्त अंदाज, प्रेक्षकांना आपलंसं करण्याचं कौशल्य यामुळे रणवीर लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. यामध्येच त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' ( Jayeshbhai Jordar) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात रणवीरने एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेमा बोमन इराणी स्क्रीन शेअर करणार असून ते रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

काय आहे ट्रेलरमध्ये?

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये जयेशभाईचे (रणवीर सिंग) वडील (बोमन इराणी) हे गावचं संरपंच आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर या सरपंचपदाची खुर्ची जयेशभाई सांभाळणार आहे. मात्र, जयेशभाईला मुलगी असल्यामुळे या खुर्चीचा आणि घराचा वारसाहक्क कोण चालवणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. यामध्येच जयेशभाईची बायको पुन्हा प्रेग्नंट असल्यामुळे यावेळी तरी मुलगा जन्माला यावा यासाठी घरातले प्रयत्न करतात. मात्र, मुलगा-मुलगी भेद करणं योग्य नाही. जे काही आहे ते देवाच्या हातात आहे असं म्हणत जयशेभाई वडिलांना आणि आईला समजवायाचा प्रयत्न करतो. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तो पत्नी व मुलीला घेऊन घरातून पळून जातो. मात्र, त्याचे वडील त्याला शोधून काढतात. विशेष म्हणजे वडिलांनी शोधल्यानंतर बाळाला काही झालं तर मी स्वत: बरंवाईट करुन घेईन अशी धमकीही जयेशभाई देतो. 

दरम्यान, या चित्रपटामध्ये सामाजिक मुद्दा उत्तमरित्या विनोदी पद्धतीने हाताळण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिव्यांग ठक्कर यांनी सांभाळली आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडेने रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

Web Title: trailer release of ranveer singh film jayeshbhai jordaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.