total dhamaal song mungda original singer usha mangeshkar slams remix | Total Dhamaal!  ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!!
Total Dhamaal!  ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!!

ठळक मुद्दे‘टोटल धमाल’मध्ये सोनाक्षीवर चित्रीत ‘मुंगडा’ गाणे हिट बनवण्यासाठी मेकर्सनी कुठलीही कसर सोडलेली नाही. अगदी सोनाक्षीने या गाण्यावर अतिशय बोल्ड मुव्ह केल्या आहेत. पण इतके करूनही या गाण्यावर प्रचंड टीका होतेय. 

‘टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा येत्या २२ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय,  चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोनाक्षीवर चित्रीत हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मुंगडा’चे रिमेक व्हर्जन आहे. १९७७ मध्ये आलेल्या ‘इंकार’ या चित्रपटातील हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले आहे. 


याच ओरिजनल गाण्याला मॉडर्न संगीताचा तडका देत, ते ‘टोटल धमाल’मध्ये वापरण्यात आले आहे. हे गाणे रिलीज झाले आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी ‘मुंगडा’ रिमेक व्हर्जन पाहून संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. आता उषा मंगेशकर यांनीही या रिमेक व्हर्जनवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी पूर्णपणे  रिमिक्स व्हर्जनच्या विरोधात आहे.  सुंदर भावभावना आणि अपार कष्टांनी आम्ही ही गाणी बनवलीत.   रिमिक्सच्या नावाखाली त्याचा असा बट्टयाबोळ करणे योग्य नाही,’असे उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे.
‘मुंगडा’ या गाण्याला संगीत देणारे राजेश रोशन यांनीही या रिमिक्स व्हर्जनवर आगपाखड केली आहे. नव्या गाण्यात नको नको ते प्रयोग केले गेले आहेत. हे गाणे ऐकल्यावर एकच वाटते, ते म्हणजे फिल्ममेकर आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसले आहेत, असे ते म्हणाले.
यापूर्वी अनेकदा लता मंगेशकर यांनीही जुन्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जनवर नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यांच्या रिमिक्सचा हा ट्रेंड पाहून मला प्रचंड वेदना होतात. रिमिक्सच्या नावाखाली जुन्या अजराअमर गाण्यांच्या चाली बदलण्यात कसली आली सर्जनशीलता? या गाण्यांच्या चाली आणि शब्द बदलण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? असा उद्विग्न सवाल अलीकडे लता मंगेशकरांनी केला होता.
‘टोटल धमाल’मध्ये सोनाक्षीवर चित्रीत ‘मुंगडा’ गाणे हिट बनवण्यासाठी मेकर्सनी कुठलीही कसर सोडलेली नाही. अगदी सोनाक्षीने या गाण्यावर अतिशय बोल्ड मुव्ह केल्या आहेत. पण इतके करूनही या गाण्यावर प्रचंड टीका होतेय. 

English summary :
Total Dhamaal is a multi-starrer comedy drama being released on 22nd February. A song from this movie has been found in the controversy. This song is a remake of 'Mungada' by Usha Mangeshkar. The song was released and there was strong response from social media. Many reacted with angry response to 'Munga' remake version including Usha Mangeshkar.


Web Title: total dhamaal song mungda original singer usha mangeshkar slams remix
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.