‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 08:00 AM2020-01-20T08:00:00+5:302020-01-20T08:00:02+5:30

अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो.

top 5 south indian actresses look beautiful without makeup like sai pallavi | ‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

googlenewsNext

रूपेरी पडद्यावर मेकअप सर्वात महत्त्वाचे असते. अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. कुणी आपले नो मेकअप लूकमधील फोटो घेऊ नयेत, म्हणून जीवाचा आटापीटा करतात. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो. साऊथच्या काही नट्यांची नावे यात ठळकपणे घेता येतील. अगदी पडद्यावरही त्या फार कमी मेकअपमध्ये वावरतात. अशाच काही नट्यांबद्दल...

साई पल्लवी

2 कोटींची फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारण्याचे धाडस दाखवणारी साई पल्लवी ही साऊथची टॉप मोस्ट अभिनेत्री आहे. साई पल्लवी रिअल लाईफमध्येच नाही तर रिल लाईफमध्येही अगदी साधी राहिते. मेकअपवर विश्वास न करता ती नैसर्गिक सौंदर्यावर भर देते. तिचा हाच साधेपणा तिच्या चाहत्यांना भावतो. तिने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेय.

सामंथा प्रभु

सामंथा प्रभु ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुपरस्टार नागार्जुनची सून अशीही तिची एक ओळख आहे. सामंथा रूपेरी पडद्यावरही फार कमी मेकअपमध्ये वावरते. ती स्वत: नो मेकअप लूकमधील अनेक फोटो शेअर करते. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर हिला मेकअपची जराही गरज नाही, हे तुम्हालाही पटेल.

तापसी पन्नू

तापसी तशी साऊथची अभिनेत्री. पण गेल्या काही वर्षांत तिने बॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तापसी अनेक चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसली.

नयनतारा

साऊथची सर्वात महागडी अ‍ॅक्ट्रेस असलेल्या नयनताराने 2003 मध्ये करिअरची सुरुवात केली आणि बघता बघता सुपरस्टार बनली. नयनतारा खºया आयुष्यात अगदी साधी राहते. तिचे नो मेकअप लूकमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. बाहुबली या चित्रपटानंतर तमन्नाला एक नवी ओळख मिळाली. मेकअपशिवायही तमन्ना कमालीची सुंदर दिसते.
 

Web Title: top 5 south indian actresses look beautiful without makeup like sai pallavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.