ठळक मुद्देनुसरत व निखील यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे प्रेम.

पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहां लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. येत्या 19 ते 21 जून यादरम्यान कोलकात्याचे बिझनेसमॅन निखील जैनसोबत नुसरत लग्नगाठ बांधणार आहेत. सोशल मीडियाने  सर्वाधिक सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत टर्कीच्या बोडरममध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. 


16 जूनला नुसरत आपल्या कुटुंबासमवेत टर्कीला रवाना होतील. 17 जूनला प्री-वेडिंग सेरेमनी आणि यानंतर 18 जूनला मेहंदी व संगीत रंगणार आहे. नुसरत यांच्या लग्नाला टॉलिवूडचे अनेक स्टार्स हजर राहण्याची शक्यता आहे. नुसरत यांची बेस्ट फ्रेन्ड आणि तृणमूल खासदार मिमी चक्रवर्ती याही या लग्नात सामील होतील, अशी शक्यता आहे.


नुसरत व निखील यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे प्रेम. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुसरत जहां बंगाली सिनेसृृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

2011 मध्ये ‘शोत्रु’ या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. यानंतर खोका 420, खिलाडी, जमाई 420, लव एक्सप्रेस, क्रिसक्रॉस, नकाब अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.


खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नुसरत आणि मिमी या दोघींनी संसद भवनाबाहेर आपआपल्या ओळखपत्रांसह फोटोसेशन केले होते. त्यांची ती छायाचित्रे लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यांनीच ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. पण हे फोटो पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोडच उठवली होती.

तुम्ही संसदेबाहेर उभ्या आहात, हे लक्षात ठेवा. तिथे काही फोटोशूट सुरू नाही. संसद हे कायदे बनवणाºयांचे सभागृह आहे. त्याचा मान ठेवा, अशा असंख्य पोस्ट सोशल मीडियावर पडल्या होत्या.  

Web Title: tmc mp actress nusrat jahan soon going to marry wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.