हृतिक रोशनसारखा डान्स करून हा TikTok युजर एका रात्रीत बनला स्टार, पहा त्याचा हा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:01 PM2020-05-19T17:01:04+5:302020-05-19T17:01:57+5:30

हा टिक टॉक युजर वलसाड येथे राहणारा सामान्य व्यक्ती असून सध्या खूप चर्चेत आला आहे.

This TikTok user became a star overnight by dancing like Hrithik Roshan, watch his viral video TJL | हृतिक रोशनसारखा डान्स करून हा TikTok युजर एका रात्रीत बनला स्टार, पहा त्याचा हा व्हायरल व्हिडिओ

हृतिक रोशनसारखा डान्स करून हा TikTok युजर एका रात्रीत बनला स्टार, पहा त्याचा हा व्हायरल व्हिडिओ

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येणार नाही. कधी कधी इंटरनेटवर असं टॅलेंट पहायला मिळते ज्यांना संधी न मिळाल्यामुळे किंवा साधनं न मिळाल्यामुळे त्यांच्यातील टॅलेंटला वाव मिळत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे रानू मंडल आणि मायकल जॅक्सनसारखे डान्स करणारा मुलगा. त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यातील टॅलेंट जगासमोर आले. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती खूप दमदार डान्स करताना दिसतो आहे.


या व्यक्तीचे नाव अर्मान राठोड असून तो वलसाडचा आहे. त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. हा एक सामान्य व्यक्ती आहे जो डान्स करतो आहे. त्याचा डान्स पाहून तुम्ही हैराण व्हाल. त्याने प्रभू देवासारखा लूक केला आहे आणि हृतिक रोशनच्या गाण्यावर डान्स करते आहे. कित्येक लोकांनी त्याची तुलना हृतिक रोशनसोबत केली आहे. हा व्यक्ती कभी खुशी कभी गम चित्रपटातील यू आर माय सोनिया या गाण्यावर डान्स करतो आहे. हा व्हिडिओ टिकटॉकवर बनवला आहे.


हा व्यक्ती टिकटॉकवर आपले व्हिडिओ शेअर करत असते आणि हृतिक रोशनने कित्येक गाण्यावर डान्स केला आहे. या व्यक्तीची स्टाईल सर्वांना खूप भावते.

कभी खुशी कभी गम चित्रपटातील यू आर माय सोनिया हे गाणं सध्या खूप चर्चेत आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. टिकटॉकवर या व्यक्तीचे जवळपास 896.4 हजार फॉलोव्हर्स आहेत आणि या व्हिडिओला ट्विटरवर हजारो लाइक्स मिळत आहेत.

Web Title: This TikTok user became a star overnight by dancing like Hrithik Roshan, watch his viral video TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.