Tik Tok स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; काय म्हणून केली आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:36 AM2020-06-26T10:36:58+5:302020-06-26T10:37:48+5:30

कुटुंबीयांनी केले धक्कादायक खुलासे

tiktok star siya kakkar commits suicide her family reveals shocking reason behind her death | Tik Tok स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; काय म्हणून केली आत्महत्या?

Tik Tok स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; काय म्हणून केली आत्महत्या?

googlenewsNext
ठळक मुद्देसिया  टिकटॉकवर विशेष लोकप्रिय होती. तिचे १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

गेल्या काही महिन्यांत मनोरंजन जगतातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली आणि मनोरंजन जगताला प्रचंड मोठा धक्का बसला.  सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते सावरले नसताना टिक टॉक  स्टार सिया कक्कडने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. सिया केवळ 16 वर्षांची होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अशात सियाच्या कुटुंबीयांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.   सियाला काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

सिया दिल्लीच्या गीता कॉलनीत कुटुंबासोबत राहत होती. आई वडिल, भाऊ बहिण असे सगळे तिच्यासोबत राहत. तिने नुकताच इन्स्टा अकाऊंटच्या स्टोरीमध्ये स्वत:चा एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. यात ती पंजाबी गाण्यावर नाचताना दिसली होती. अशाप्रकारचे अनेक डान्स व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत होती. टिकटॉकवरच्या व्हिडीओमुळे तिला गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या. या धमक्यांवर ती कधीकधी चिंता व्यक्त करायची. अर्थात या धमक्यांना त्रासून सियाने आत्महत्या केली की अन्य काही कारणांने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने आत्महत्या केली त्यादिवशी ती अगदी सामान्य होती. आत्महत्येच्या एक दिवसआधी ती तिच्या मॅनेजरशी बोलली होती. तेव्हाही तिचे बोलणे अगदी सामान्य वाटत होते. अशात तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे कळायला मार्ग नाही.

 सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सिया  टिकटॉकवर विशेष लोकप्रिय होती. तिचे १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तर इन्स्टाग्रामवरही १.३५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते.

Web Title: tiktok star siya kakkar commits suicide her family reveals shocking reason behind her death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.