भाचीसोबत चालत्या रेल्वेत छेडछाड, ‘हेल्पलाईन’वर भडकले तिग्मांशू धुलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:09 AM2020-01-27T11:09:19+5:302020-01-27T11:10:49+5:30

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रत्यक्षात मदतीची वेळ आली की सिद्ध होते. बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांना अलीकडे याचा प्रत्यय आला.

tigmanshu dhulia niece harrased in train by drunk boys , asking for help |  भाचीसोबत चालत्या रेल्वेत छेडछाड, ‘हेल्पलाईन’वर भडकले तिग्मांशू धुलिया

 भाचीसोबत चालत्या रेल्वेत छेडछाड, ‘हेल्पलाईन’वर भडकले तिग्मांशू धुलिया

googlenewsNext
ठळक मुद्देसाहेब, बीवी और गँगस्टर या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या तिग्मांशू यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रत्यक्षात मदतीची वेळ आली की सिद्ध होते. बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांना अलीकडे याचा प्रत्यय आला. ट्रेनमधून प्रवास करणाºया भाचीसाठी त्यांनी मदत मागितली. मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्स मिळवले. पण त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी  ट्वीटरवरून लोकांना मदतीची याचना करावी लागली.


तिग्मांशू यांची भाची 26 जानेवारीला उद्यान एक्स्प्रेसने बेंगळुरूला निघाली होती. याचदरम्यान नशेत तर्र असलेल्या चार भामट्यांनी तिची छेड काढली. या घटनेनंतर तिग्मांगू यांनी  ट्वीट करत लोकांची मदत मागितली. ‘माझी भाची उद्यान एक्स्पेसने बेंगळुरूला जात आहे. ती बी-3 बर्थवर आहे. नशेत तर्र असलेल्या चार जणांनी तिच्यासोबत छेडछाड केली. ती घाबरलेली आहे. काय कुणी मदत करू शकते?’, असे  ट्वीट त्यांनी केले. हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला न गेल्यामुळे अखेर त्यांनी ट्वीट करून मदतीची याचना केली.


तासाभरानंतर तिग्मांशूने दुस-यांदा ट्वीट करत मदत करणा-यांचे आभार मानले.  पोलिसांचेही त्याने आभार मानले. सोबत हेल्पलाईन क्रमांकावर संताप व्यक्त केला. ‘मदतीसाठी धन्यवाद. हेल्पलाईन नंबर्स कुठल्याही कामाचे नाहीत. जुगाड केला आणि पोलिस मदतीसाठी पोहोचलेत. आता माझी भाची सुरक्षित आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. मी पोलिस आणि संबंधित विभागांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानतो. पण हेल्पलाईन नंबर्स कुठल्याही कामाचे नाहीत, यावर मी ठाम आहे,’असे त्यांनी लिहिले.


दरम्यान भारतीय रेल्वेने तिग्मांशू यांच्या या ट्वीट ची दखल घेतली. ज्या हेल्पलाईन नंबर्सवरून मदत मिळाली नाही, ते नंबर्स आम्हाला पाठवलेत तर आभारी असू, असे भारतीय रेल्वेने ट्वीट केले.
 साहेब, बीवी और गँगस्टर या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या तिग्मांशू यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चरस, शागिर्द, पान सिंग तोमर, साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

Read in English

Web Title: tigmanshu dhulia niece harrased in train by drunk boys , asking for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.